मुंबई : महापालिका, जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्य विधिमंडळाचे ६ मार्चपासून सुरू होत असलेले अर्थसंकल्पीय अधिवेशन वादळी होण्याची शक्यता आहे. अधिवेशन ७ एप्रिलला संस्थगित होईल. या अधिवेशनात आमच्या सरकारला कोणताही धोका नसेल, असा दावा संसदीय कामकाजमंत्री गिरीश बापट यांनी केला. निवडणुकांचे परिणाम, सरकारचे स्थैर्य आणि आरोप-प्रत्यारोपांची छाया या अधिवेशनावर असेल. वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार हे १८ मार्च रोजी अर्थसंकल्प सादर करतील.
राज्याचा अर्थसंकल्प १८ मार्च रोजी
By admin | Published: February 28, 2017 5:17 AM