सुपे येथे पाण्यासाठी रास्ता रोको
By admin | Published: May 19, 2016 01:52 AM2016-05-19T01:52:49+5:302016-05-19T01:52:49+5:30
येथील गावठाण तलावामध्ये शासनाने टंचाईमधून जनाई उपसासिंचन योजनेचे पाणी सोडावे
सुपे : येथील गावठाण तलावामध्ये शासनाने टंचाईमधून जनाई उपसासिंचन योजनेचे पाणी सोडावे, यासाठी सुपे चौकात चौफुला-मोरगाव रस्त्यावर तालुका राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने मंगळवारी (दि. १७) रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. या वेळी सुमारे तासभर सुरू असलेल्या आंदोलनामुळे मोरगाव व चौफुला रस्त्याच्या दुतर्फा वाहनांच्या लांबच्या लांब रांगा लागल्या होत्या.
वरवंड तलावातून पाणी सोडल्यास जिरायती भागातील टँकर भरण्याचा प्रश्न मिटणार असून टंचाई निवारणासाठी मदत होणार आहे. दुष्काळ जाहीर झाला असतानाही यापूर्वी ग्रामस्थांनी लोकसहभागातून अडीच लाख रुपये गोळा करून तलावात पाणी घेतले होते.
मात्र शासनाचे याकामी दुर्लक्ष होत असल्याची टीका शंकरराव चांदगुडे, बी. के. हिरवे, पोपटराव पानसरे, मनोज काळखैरे, मामा दरेकर, रघुनाथ कुतवळ, सोपानराव भोंडवे, तानाजी खोमणे, अशोक धेंडे आदींनी आपल्या मनोगतातून केली. या वेळी युती शासनाच्याविरोधात घोषणाबाजी करून निषेध व्यक्त केला.
होळकर म्हणाले, की सध्याचे सरकार हे बारामती तालुक्याला सापत्नपणाची वागणूक देत आहे. चारा डेपो, चारा छावणी, टँकर, जनावराचे पाणी व जवाहर विहीर इत्यादीबरोबर अनेक गोष्टीपासून तालुक्याला वंचित ठेवत आहे. तसेच पुरंदर उपसा, जनाई-शिरसाई उपसासिचंन योजनेला पाणी न सोडल्यामुळे टंचाईमध्ये अधिकची भर पडली आहे.
सरकारच्या धोरणांना शेतकरी पुरता वैतागला आहे. या सरकारने शेतकऱ्यांचे त्वरित १०० टक्के कर्ज व वीज बिल माफी करावी, अशीही मागणी होळकर यांनी त्या वेळी केली. राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष संभाजी होळकर यांच्या अध्यक्षतेखाली या रास्ता रोको आंदोलनाचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी नायब तहसीलदार पाटील व जनाई योजनेचे उपअभियंता आर. एन. सालगुडे यांना पाणी सोडण्याबाबतचे लेखी पत्र देण्यात आले.
याप्रसंगी सोमेश्वर कारखान्याचे अध्यक्ष पुरुषोत्तम जगताप, पंचायत समितीचे सभापती करण खलाटे, उपसभापती दत्तात्रय लोंढे, खरेदी-विक्री संघाचे चेअरमन दत्तात्रय कुतवळ, ज्ञानेश्वर कदम, शंकरराव चांदगुडे, भरत खैरे, अप्पासाहेब शेळके, राजेंद्र रायकर, संपतराव जगताप, रघुनाथ कुतवळ, तानाजी खोमणे,
बी. के. हिरवे, संजय दरेकर, अंकुश रसाळ, सुरेश रसाळ, बबनराव वाघ,
संपतराव काटे, दादा पाटील,
शफीक बागवान, नंदाताई खैरे,
संजय पोमण, बापूराव गवळी, संजय गाडेकर, राहुल वाबळे, गणेश चांदगुडे, राजेंद्र जाधव, पोपट तावरे, हनुमंत भापकर, यादवराव कुदळे, बापूराव चांदगुडे, रवींद्र भापकर, वनिता चौधरी, गावोगावचे सरपंच, उपसरपंच, सदस्य, युवकचे कार्यकर्ते व ग्रामस्थ आदी आंदोलनात सहभागी झाले होते. (वार्ताहर)