Lockdown in Maharashtra: शुक्रवारी रात्रीपासून सोमवार सकाळपर्यंत कडक लॉकडाऊन; नवाब मलिकांची घोषणा
By ऑनलाइन लोकमत | Published: April 4, 2021 05:27 PM2021-04-04T17:27:28+5:302021-04-04T17:48:54+5:30
Lockdown in Maharashtra at weekend: मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या अध्यक्षतेखाली आज महाराष्ट्रातील लॉकडाऊनबाबत घोषणा करण्यात आली. यामध्ये आठवड्याचे पाच दिवस कडक निर्बंध आणि शनिवार-रविवार कडक लॉकडाऊन करण्यात येण्याबाबत निर्णय घेण्यात आला. (Strict Restrictions in Maharashtra from tomorrow, 5th April 2021.)
मुंबई: राज्यात उद्यापासून कडक निर्बंध (Strict Restrictions) लावण्यात येणार आहेत. तसेच शुक्रवारी रात्री 8 ते सोमवारी सकाळी 7 वाजेपर्यंत कडक लॉकडाऊन करण्य़ात येणार असल्याची घोषणा राज्याचे मंत्री नवाब मलिकांनी केली आहे. (weekend lockdown In Maharashtra; Nawab Malik Told)
Night curfew will be put in place from 8 pm to 7 am. Only essential services will be permitted. Restaurants are permitted only for take away & parcel services. For offices, employees will have to work from home. Detailed SOP will be released soon:Maharashtra Minister Aslam Shaikh pic.twitter.com/FRcUsZZ89S
— ANI (@ANI) April 4, 2021
Lockdown in Maharashtra: राज्यात उद्यापासून कडक निर्बंध; काय सुरु, काय बंद?, नक्की जाणून घ्या!
मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या अध्यक्षतेखाली आज महाराष्ट्रातील लॉकडाऊनबाबत घोषणा करण्यात आली. यामध्ये आठवड्याचे पाच दिवस कडक निर्बंध आणि शनिवार-रविवार कडक लॉकडाऊन करण्यात येण्याबाबत निर्णय घेण्यात आला. उद्या सायंकाळी 8 वाजल्यापासून नियमावली लागू होईल. उद्योग व्यवसायांना कंपनीच्या वेळा ठरविण्यात येणार आहेत. सिनेमागृहे, नाट्यगृह बंद राहणार आहेत. कंपन्यांमध्ये कोरोना रुग्ण सापडला तर त्याची जबाबदारी कंपनी मालकाची असेल, असे मुंबईच्या पालकमंत्र्यांनी सांगितले. रात्रीच्या वेळी अत्यावश्यक सेवांनाच संचार करण्यास मुभा देण्यात येणार आहे.
कालच मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी राज्यातील प्रसारमाध्यमांच्या संपादकांशी बोलताना आता लॉकडाऊन करण्याची वेळ आल्याचे सांगितले होते. हळूहळू निर्बंध लादून लोक ऐकत नाहीत. यामुळे आधी संपूर्ण लॉकडाऊन आणि नंतर हळूहळू सूट देण्याची योजना असल्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांच्यासह मुख्यमंत्र्यांनी संकेत दिले होते. राज्यासह मुंबईत बस, लोकल सेवा आसन क्षमतेनुसार सुरु ठेवण्यात येणार आहेत.