विलीनीकरण होईपर्यंत संप सुरूच -ॲड. सदावर्ते
By ऑनलाइन लोकमत | Published: November 25, 2021 11:05 AM2021-11-25T11:05:27+5:302021-11-25T11:06:15+5:30
इथे आमचे दोन आमदार बसले होते, त्या आमच्या दोन आमदारांची फसवणूक झाली आहे. शेतकऱ्यांचे दिल्लीत आंदोलन सुरू आहे. ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका करीत आहेत. त्यांच्यापुढे मोदी सरकार झुकले असून, त्यांनी ते कायदे शेतकऱ्यांच्या फायद्यासाठी मागे घेतले.
मुंबई : जोपर्यंत विलीनीकरण होत नाही तोपर्यंत कोणताही कर्मचारी कामावर जाणार नाही, असे ॲड. गुणरत्न सदावर्ते यांनी सांगितले. ॲड. सदावर्ते म्हणाले, आज राज्य सरकारने तुटपुंजी वेतनवाढ दिली आहे. कर्मचाऱ्यांनी वेतनवाढीची नाही, तर विलीनीकरणाची मागणी केली होती. वेतनवाढ दिली तरी संप मागे घेतला जाणार नाही. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी फोडाफोडीचे राजकारण केले आहे. या बोटावरील थुंकी त्या बोटावर केली आहे. भावाभावांत भांडण लावणारे तुम्ही शरद पवार आहात. तुम्ही आमच्यात फूट पाडली आहे. जो निर्णय झाला ती एक फसवणूक आहे.
इथे आमचे दोन आमदार बसले होते, त्या आमच्या दोन आमदारांची फसवणूक झाली आहे. शेतकऱ्यांचे दिल्लीत आंदोलन सुरू आहे. ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका करीत आहेत. त्यांच्यापुढे मोदी सरकार झुकले असून, त्यांनी ते कायदे शेतकऱ्यांच्या फायद्यासाठी मागे घेतले. आजपर्यंत ४० एसटी कर्मचाऱ्यांनी आत्महत्या केली आहे. तरीही राज्य सरकारला मायेचा पाझर फुटत नाही, असे सदावर्ते म्हणाले मला फोन करून कर्मचाऱ्यांनी वेतनवाढीबाबत नाराजी व्यक्त केली आहे, काहींनी आत्महत्या करण्याचा विचार बोलून दाखविला. त्यांना काही झाल्यास त्याची जबाबदारी सरकारची असेल, असाही इशारा सदावर्ते यांनी दिला.