शाळेत ‘फी’साठी विद्यार्थ्यांना डांबले
By admin | Published: December 3, 2014 03:44 AM2014-12-03T03:44:49+5:302014-12-03T03:44:49+5:30
येथील सेंट फ्रान्सिस हायस्कूलने फी न भरणा-या विद्यार्थ्यांना वर्गात डांबून ठेवल्याने शाळेच्या मुख्याध्यापकासह तिच्या पतीवर गुन्हा दाखल झाला असून पोलिसांनी दोघांना अटक केली आहे.
नाशिक : येथील सेंट फ्रान्सिस हायस्कूलने फी न भरणा-या विद्यार्थ्यांना वर्गात डांबून ठेवल्याने शाळेच्या मुख्याध्यापकासह तिच्या पतीवर गुन्हा दाखल झाला असून पोलिसांनी दोघांना अटक केली आहे.
शाळेने केलेली फी वाढ शिक्षण मंडळाने बेकायदेशीर ठरविल्यानंतरही प्रशासनाने फी वसुलीसाठी लगादा लावला आहे. व्यवस्थापनाने मंगळवारी मुलांच्या पालकांना दूरध्वनी करून फी न भरल्यास पाल्यास सोडणार नसल्याचे सांगितल्यानंतर शाळेत गेलेल्या पालकांना आपल्या मुलांना डांबून ठेवल्याचे आढळले. पालकांचा प्रशासनाशी वाद झाला़ सचिन धमेंद्र सिन्हा यांनी सरकारवाडा पोलिसांत दिलेल्या फिर्यादीत शाळेने पालकांना कोणतीही पूर्वसुचना न देता सुमारे ३५ टक्के फी वाढ केल्याचे म्हटले आहे. पालकांच्या आंदोलनानंतर शिक्षण प्रसारण अधिकाऱ्याने फी वाढ बेकायदेशीर ठरविली़ जुनपासून पालकांनी शाळा व बसची फी भरलेली नाही़ तसेच शाळेनेही त्याबाबत कळविलेले नाही़ पालकांनी जाब विचारला असता शेट्टी यांचे पती चंद्रशेखर यांनी अनिल झाल्टे या पालकास मारहाण केली़ (प्रतिनिधी)