हितेन नाईकपालघर : जिल्हा परिषदेने पटसंख्या कमी असलेल्या १२९ शाळा बंद करण्याचा निर्णय घेतल्याने आदिवासीबहुल भागांतील संतप्त पालक-विद्यार्थी गुरुवारी कोंबड्या-शेळ्यांंसह रस्त्यावर उतरले. ‘दप्तर परत घ्या, कोंबड्या-बकºया चरायला द्या,’ अशा घोषणा देत श्रमजीवी संघटनेच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा जिल्हा परिषदेवर धडकला.सरकारच्या वित्त खात्याच्या आदेशाचा संदर्भ देत जि.प.च्या मुख्य कार्यकारी अधिकारी निधी चौधरी यांनी कमी पटांच्या शाळा बंद करण्याचे आदेश दिले होते. या बंद केलेल्या शाळा दुसºया शाळांना जोडण्याचा दावा बोगस असल्याचे जव्हार येथील तळ्याचा पाडा येथील शाळा बंद करून जवळच्या शाळेत न जोडता दूरवरील कुंडाचा पाडयाला जोडल्याच्या उदाहारणावरून सिद्ध होत असल्याची टीका श्रमजीवीच्या आराध्य पंडित यांनी केली. शाळा बंद करण्याचा निर्णय घेणाºयांवर अनुसूचित जातीजमाती प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हे दाखल करण्याची मागणी संघटनेचे जिल्हाध्यक्ष सुरेश रेंजड आणि सहचिटणीस विजय जाधव यांनी केली आहे.
शेळ्या घेऊन विद्यार्थी उतरले रस्त्यावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 28, 2017 5:12 AM