ऑनलाइन लोकमत
सोलापूर, दि. 10 - गुंडांना पक्षात घेऊन निवडून आणू आणि नंतर त्यांना सुधारण्याचं काम करु असं अजब वक्तव्य सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी केलं आहे. सोलापुरात पत्रकारांशी बोलताना त्यांनी हे अजब गजब वक्तव्य केलं आहे.
गुंडांना पक्षात प्रवेश दिल्याने विरोधक अगोदरच भाजपावर टीका करत असतान दुसरीकडे सुभाष देशमुख यांनी केलेल्या समर्थनामुळे आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. एबीपी माझाने याबाबत वृत्त दिलं आहे.
वादग्रस्त आणि गुंड प्रवृत्तीचे लोक पक्षात येत असतील तर त्यांच्यासाठी ही सुधारण्याची संधी आहे असंही ते बोलले आहेत. सज्जन विरुद्ध दुर्जन अशी महाभारताची लढाई आहे, यात सज्जनांचा विजय होईल असं बोलताना भाजपा मिनी विधानसभेत मुसंडी मारेल, असा विश्वास देशमुख यांनी व्यक्त केला आहे.