सुब्रतो रॉय यांचा तुरुंगातील मुक्काम आणखी वाढला
By admin | Published: June 5, 2014 12:38 AM2014-06-05T00:38:36+5:302014-06-05T00:38:36+5:30
सहारा समूहाचे सव्रेसर्वा सुब्रतो रॉय यांचा तिहार तुरुंगातील मुक्काम आणखी वाढला आह़े स
Next
>नवी दिल्ली : सहारा समूहाचे सव्रेसर्वा सुब्रतो रॉय यांचा तिहार तुरुंगातील मुक्काम आणखी वाढला आह़े सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी राय यांना त्यांच्या निवासस्थानी नजरकैदेत ठेवण्याची विनंती फेटाळून लावली़ तथापि त्यांच्या सुटकेसाठी पाच हजार कोटी रुपये रोख आणि तितक्याच बँक हमी रूपातील रकमेची व्यवस्था करण्यासाठी सहारा समूहास मालमत्ता विकण्याची परवानगी न्यायालयाने दिली़
न्या़ टी़एस़ ठाकूर आणि न्या़ ए़क़ेसिकरी यांच्या खंडपीठाने आधीच्या आदेशात थोडी सुधारणा करीत सहरा समूहाला नऊ देशांतील संपत्ती विकण्याची परवानगी दिली़ ही संपत्ती सर्कल रेटपेक्षा कमी भावात विकता येणार नाही़ तसेच ती खरेदी करणारा सहारा समूहाशी संबंधित नसावा, असे न्यायालयाने यावेळी बजावल़े
न्यायालयाने कायमस्वरूपी ठेव(फिक्स डिपॉङिाट) आणि इतर ठेवी रोकड रूपात रूपांतरित करण्याची परवानगी देत ही सर्व रक्कम सेबीच्या देखरेखीखाली एका बँकेच्या खात्यात जमा करावी, असे न्यायालयाने म्हटल़े यावेळी रॉय यांना त्यांच्याच घरात नजरकैदेत ठेवण्याची विनंती मात्र न्यायालयाने फेटाळून लावली़ वारंवार आदेश देऊनही गुंतवणूकदारांचे पैसे परत न केल्याबद्दल 65 वर्षीय राय गेल्या 4 मार्चपासून तिहार तुरुंगात आहेत़
(लोकमत न्यूज नेटवर्क)