सुमित मलिक राज्याचे मुख्य सचिव

By admin | Published: February 28, 2017 05:26 AM2017-02-28T05:26:24+5:302017-02-28T05:26:24+5:30

सुमित मलिक हे राज्याचे नवे मुख्य सचिव असतील. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी त्यांच्या नियुक्तीवर शिक्कमोर्तब केल्याची माहिती सूत्रांनी दिली.

Sumit Malik, the Chief Secretary of the state | सुमित मलिक राज्याचे मुख्य सचिव

सुमित मलिक राज्याचे मुख्य सचिव

Next


मुंबई : सुमित मलिक हे राज्याचे नवे मुख्य सचिव असतील. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी त्यांच्या नियुक्तीवर शिक्कामोर्तब केल्याची माहिती सूत्रांनी दिली.
सध्याचे मुख्य सचिव स्वाधीन क्षत्रिय उद्या मंगळवारी सेवानिवृत्त होत आहेत. ते ३१ जानेवारीलाच सेवानिवृत्त झाले होते. मात्र राज्यभरातील निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांनी त्यांना एक महिन्याची मुदतवाढ दिली होती. सुमित मलिक हे १९८२ च्या तुकडीचे आयएएस अधिकारी आहेत. सध्या ते सामान्य प्रशासन विभाग (राज शिष्टचार)चे अति. मुख्य सचिव आहेत. ज्येष्ठतेच्या निकषावर त्यांना मुख्यमंत्र्यांनी ही नवी संधी दिल्याचे म्हटले जाते. मलिक यांचा मुख्य सचिव पदाचा कार्यकाळ सुमारे २ वर्षांचा असेल. शांत व संयमी स्वभावाचे, तसेच शिस्तप्रिय अधिकारी म्हणून त्यांचा लौकीक आहे. व्यक्ती म्हणून प्रशासनावर छाप सोडण्याऐवजी शासकीय कामकाज अधिक परिणामकारक व सुरळीत होण्याच्या दृष्टीने व्यवस्था निर्माण करण्यावर त्यांचा नेहमीच भर राहिला आहे. (खास प्रतिनिधी)
>मलिक यांचा मुख्य सचिव पदाचा कार्यकाळ सुमारे दोन वर्षांचा. शांत व संयमी स्वभावे, शिस्तप्रिय अधिकारी म्हणून लौकीक.

Web Title: Sumit Malik, the Chief Secretary of the state

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.