लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : केंद्र सरकारने महाराष्ट्राला तातडीने रेमडेसिविर आणि ऑक्सिजनचा पुरवठा करावा, अशी विनंती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शुक्रवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासमवेत कोरोनासंदर्भात आयोजित बैठकीत मुख्यमंत्री बोलत होते. दूरदृश्य प्रणालीद्वारे आयोजित या बैठकीत देशातील सर्वाधिक कोरोनाग्रस्त असलेल्या राज्यांचे मुख्यमंत्री सहभागी झाले होते.
कोरोनाविरुद्धची लढाई आम्ही कोणत्याही परिस्थितीत जिंकूच, असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी या वेळी व्यक्त केला. महाराष्ट्राला अधिक ऑक्सिजनची गरज असून रेमडेसिविरचा पुरेसा पुरवठाही आवश्यक आहे. आपल्याकडे लस उत्पादक कंपन्यांची मर्यादित क्षमता पाहता लसी आयात करून लसीकरण वाढवता येईल, अशी सूचना मुख्यमंत्र्यांनी केली.
लसींची आयात करण्याची परवानगी राज्याने मागितली तर ती मिळायला हवी. कारण महाराष्ट्रात १८ ते ४४ वयोगटातील लोकसंख्या ५ कोटी ७१ लाख असून १२ कोटी लसींची गरज आहे. महाराष्ट्राला दररोज ७० हजार कुपींची गरज आहे. मात्र दररोज २७ हजार कुपींचाच पुरवठा होतो, याकडे मुख्यमंत्र्यांनी लक्ष वेधले.
मुख्यमंत्र्यांनी केलेल्या मागण्याnरेमडेसिविर पुरवठा रुग्णसंख्येनुसार करा. इतर आवश्यक औषधांचा नियमित पुरवठा करावा.nऑक्सिजन आणण्यासाठी वायुदल व राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन विभागाची मदत घ्यावी. ऑक्सिजनचा २५० ते ३०० मे. टन अतिरिक्त साठा उपलब्ध असणे गरजेचे आहे.nकेंद्राने १३ हजार जम्बो सिलिंडर व सुमारे ११०० व्हेंटिलेटर्स महाराष्ट्राला द्यावेत. खासगी कॉर्पोरेट समूहांना सीएसआरच्या माध्यमातून लस खरेदीची परवानगी द्यावी.