रोड ट्रान्सपोर्ट सेफ्टी बिल मागे घ्या
By admin | Published: December 19, 2014 04:41 AM2014-12-19T04:41:53+5:302014-12-19T04:41:53+5:30
रोड ट्रान्सपोर्ट सेफ्टी बीलाच्या विरोधात देशभरातील सार्वजनिक उपक्रमातील परिवहन कामगारांनी दिल्लीत गुरुवारी धरणे आंदोलन केले.
मुंबई : रोड ट्रान्सपोर्ट सेफ्टी बीलाच्या विरोधात देशभरातील सार्वजनिक उपक्रमातील परिवहन कामगारांनी दिल्लीत गुरुवारी धरणे आंदोलन केले. यामध्ये महाराष्ट्रातील एसटी कामगारांनीही सहभाग घेतला. केंद्र शासनाच्या संबंधित विभागाने बिलाबाबत संघटनांनी घेतलेल्या आक्षेपासंबंधी जानेवारी २0१५ पर्यंत सकारात्मक निर्णय घ्यावा किंवा हे बील मागे घ्यावे. यावर सकारात्मक निर्णय न घेतल्यास मार्च २0१५च्या पहिल्या आठवड्यात देशव्यापी संपाचा इशारा सर्व कामगार संघटनांनी घेतला आहे.
एसटी महामंडळ डोंगराळ आणि अतिदुर्गम भागात प्रत्येक दिवशी २९,६३७ बंधनकारक फेऱ्या करुन ५७३ कोटी ६१ लाख रुपयांचा तोटा सहन करत आहे. हा तोटा सहन करुनही एसटी आपली सेवा चांगल्यातऱ्हेने देत आहे. या बिलाची अंमलबजावणी झाल्यास खासगी वाहतुक कंपन्यांचा मोठा भरणा होऊ शकतो आणि एसटीचे अस्तित्व धोक्या येऊ शकते. हे पाहता बिलाच्या विरोधात दिल्ली येथे प्रवासी संघटनेचे प्रतिनिधी आणि परिवहन क्षेत्रातील प्रतिनिधी यांनी संयुक्त आंदोलन केले. आंदोलनात मोठ्या संख्येने कामगार सहभागी झाल्याचे महाराष्ट्र एसटी कामगार संघटनेचे अध्यक्ष शिवाजीराव चव्हाण यांनी सांगितले. यावर तोडगा न निघाल्यास मार्च २0१५ च्या पहिल्या आठवड्यात संप करण्याचा निर्णय झाला आहे. ६ फेब्रुवारी रोजी दिल्ली येथे देशव्यापी परिवहन कामगारांच्या प्रतिनिधींची बैठक होणार असल्याचे चव्हाण यांनी सांगितले.