‘टेकआॅफ’ला ‘कभी हाँ, कभी ना’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 3, 2016 01:21 AM2016-11-03T01:21:31+5:302016-11-03T01:21:31+5:30

पुरंदर तालुक्यात विमानतळ होणार म्हणून अनेक गावांत उत्साही वातावरण आहे;

'Take Yes', 'Never Yes, Never' | ‘टेकआॅफ’ला ‘कभी हाँ, कभी ना’

‘टेकआॅफ’ला ‘कभी हाँ, कभी ना’

Next


भुलेश्वर : पुरंदर तालुक्यात विमानतळ होणार म्हणून अनेक गावांत उत्साही वातावरण आहे; मात्र दुसऱ्या बाजूला विमानतळबाधित गावांशी घोषणा झाल्यापासून आजवर कोणीही साधी चर्चाही केली नसल्याने गावा-गावांत साशंकतेचे वातावरणही आहे. त्यामुळे पुरंदरच्या ‘टेकआॅफ’साठी कभी हाँ...कभी ना.. अशी परिस्थिती निर्माण झाल्याचे दिसून येत आहे.
पुरंदर तालुक्यात आंतरराष्ट्रीय दर्जाचे विमानतळ होत असल्याने अनेक वर्षे दुष्काळी तालुक्याचा मोठ्या प्रमाणात विकास होणार आहे. येथील जनजीवन उंचावणार आहे. म्हणून तालुक्यात आनंदाचे वातावरण आहे. या ठिकाणी मोठमोठ्या कंपन्या, गोडावून, तरुणांना नोकऱ्या, व्यवसाय करण्यासाठी भविष्यात मोठी संधी निर्माण होणार आहे.
मात्र बाधित गावांतील शेतकऱ्यांचा या विमानतळास तीव्र विरोध आहे. या विमानतळासाठी आम्ही एक इंचही जागा देणार नाही, असा पवित्रा घेतला आहे. आमच्या जमिनीवर आंतरराष्ट्रीय दर्जाचे विमानतळ होत असताना आम्हाला विश्वासात घेतले जात नाही. आमच्या समस्या कोणी ऐकून घेत नसल्याची खंत येथील शेतकऱ्यांनी व्यक्त केली.
>जमिनींसाठी श्रीमंतांच्या फेऱ्या वाढल्या
पुरंदर तालुक्यात जमिनी खरेदी करण्यासाठी उद्योगपतींच्या घिरट्या मोठ्या प्रमाणात सुरू झाल्या आहेत. माझी जमीन घेता का जमीन म्हणणारे शेतकरी विमानतळाच्या निर्णयाची वाट पाहत आहेत. यामुळे एजंट लोकांचा सुळसुळाट झाला आहे.
>शेतकऱ्यांचे कल्याण होणार
आंतरराष्ट्रीय दर्जाच्या विमानतळामुळे तालुक्याचा विकास होतानाच बाधित शेतकऱ्यांना जमिनीचा परतावा, जमिनीतील दहा वर्षांचे उत्पन्न शेतकऱ्यांना मिळणार असल्याने दहा पिढ्यांचे कल्याण होणार
असल्याचे
चित्र उभे
केले जात
आहे.
धरणग्रस्तांच्या पुनर्वसनाचा प्रश्न अद्यापही सुटलेला नाही, त्यात विमानतळासाठी ज्या शेतकऱ्यांच्या जमिनी जाणार आहेत, त्यांच्या पुनर्वसनाचे काय? आंतरराष्ट्रीय विमानतळामुळे पुरंदर तालुक्याचा विकास होईल; परंतु त्या मातीत जन्मलेल्या लोकांची माती करू नका. स्थानिक लोकांना रोजगार उपलब्ध करून देत असतानाच राजकारण करू नका. शेतकऱ्यांवर अन्याय होत असेल, तर लहुजी शक्ती सेना शेतकऱ्यांच्या पाठीशी उभी राहील. - मस्कू शेंडगे,
जिल्हाध्यक्ष, लहुजी शक्ती सेना
>गावांचा प्रखर विरोध
राजेवाडी, आंबळे, वाघापूर, पारगाव, एखतपूर, मुंजवडी, खानवडी या बाधित गावांची जमीन जाणार असल्याने या गावाचा या विमानतळास तीव्र विरोध आहे. विमानतळ होऊ नये, यासाठी बाधित गावांमधील शेतकऱ्यांनी ऐन दिवाळीत पाडव्याला काळ््या गुढ्या उभारल्या आहेत. अनेक शेतकऱ्यांनी जमिनीत अनेक सुधारणा केल्या आहेत. पाइपलाइन, शेती ठिबक सिंचनाखाली आणून फळबागा फुलवल्या आहेत. दुष्काळी पुरंदर तालुक्यातील शेतीला प्रयत्नपूर्वक सुगीचे दिवस आले असताना आमच्या जमिनी जाणार अशी शेतकऱ्यांची भावना आहे.

Web Title: 'Take Yes', 'Never Yes, Never'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.