मुंबईचे तायडे, हातिस्कर यांना शिक्षक पुरस्कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 2, 2017 05:07 AM2017-09-02T05:07:48+5:302017-09-02T05:08:56+5:30
राष्ट्रीय शिक्षक पुरस्कारांची घोषणा शुक्रवारी करण्यात आली. या पुरस्कारांमध्ये राज्यातील प्राथमिकच्या १७ व माध्यमिकच्या ८ अशा एकूण २५ शिक्षकांचा समावेश आहे. २०१६-१७ या वर्षात मुंबईचे नागोराव तायडे व तृप्ती हातिस्कर यांची निवड झाली आहे़
पुणे : राष्ट्रीय शिक्षक पुरस्कारांची घोषणा शुक्रवारी करण्यात आली. या पुरस्कारांमध्ये राज्यातील प्राथमिकच्या १७ व माध्यमिकच्या ८ अशा एकूण २५ शिक्षकांचा समावेश आहे. २०१६-१७ या वर्षात मुंबईचे नागोराव तायडे व तृप्ती हातिस्कर यांची निवड झाली आहे़
राज्यातील २५ शिक्षकांचा सन्मान
प्राथमिक विभाग - १. नागोराव तायडे (जयंतीलाल वैष्णव मार्ग, महापालिका मराठी शाळा, घाटकोपर, मुंबई), २. उज्ज्वला नांदखिले (जि. प. शाळा, साडेसतरा नळी, ता. हवेली, जि. पुणे), ३. शोभा माने (जि. प. शाळा क्र. १, चिंचणी, ता. तासगाव, जि. सांगली), ४. तृप्ती हातिसकर (प्रभादेवी मनपा शाळा क्र. २, मुंबई), ५. सुरेश शिंगणे (जि. प. शाळा, पिंपळगाव चिलमखा, ता. देऊळगाव राजा, जि. बुलडाणा), ६. संजीव बागुल (जि. प. शाळा, सांभवे, ता. मुळशी, जि. पुणे), ७. रमेशकुमार फाटे (जि. प. शाळा, डोंगरगाव, जि. भंडारा), ८. ज्योती बेळवले (जि. प. शाळा, केवनीदिवे, ता. भिवंडी, जि. ठाणे), ९. अर्जुन तकटे (जि. प. शाळा, अहेरगाव, ता. निफाड, जि. नाशिक), १०. रुक्मिणी कोळेकर (जि. प. शाळा, वांगणी २, ता. करमाळा, जि. सोलापूर), ११. रामकिसन सुरवसे (जि. प. शाळा, नागोबावाडी, ता. औसा, जि. लातुर), १२. प्रदीप शिंदे (जि. प. शाळा, शिलापूर, जि. नाशिक), १३. अमिन चौहान (जि. प. शाळा, निंभा, ता. दिग्रस, जि. यवतमाळ), १४. ऊर्मिला भोसले (जि. प. शाळा, महाळदापुरी, ता. वाशी, जि. उस्मानाबाद), १५. गोपाळ सूर्यवंशी (जि. प. शाळा, गांजुरवाडी, जि. लातुर)
राष्ट्रीय शिक्षक पुरस्कारांची यादी
प्राथमिक विशेष शिक्षक
१. अर्चना दळवी (जि. प. शाळा, बहुली, ता. हवेली, जि. पुणे)
२. सुरेश धारराव (जि. प. शाळा, निफाड क्र. २, ता. निफाड, जि. नाशिक)
माध्यमिक विभाग
१. नंदा राऊत (मोतीलाल कोठारी विद्यालय, कडा, ता. आष्टी, जि. बीड)
२. स्मिता करंदीकर (अहिल्यादेवी हायस्कूल, शनिवार पेठ, पुणे)
३. नंदकुमार सागर (जिजामाता हायस्कूल, जेजुरी, ता. पुरंदर, जि. पुणे)
४. शर्मिला पाटील (अंबिका विद्यालय, केडगाव, ता. अहमदनगर)
५. सुनील पंडित (प्रगत विद्यालय, नवी पेठ, अहमदनगर)
६. डॉ. कमलाकर राऊत (योगेश्वरी नूतन विद्यालय, अंबेजोगाई, जि. बीड)
७. संजय नरलवार (प्रियांका हायस्कूल, कानेरी, जि. गडचिरोली)
माध्यमिक विशेष शिक्षक
१. मीनल सांगोले (मूकबधिर शाळा, शंकर नगर, नागपूर)
सोनेरी क्षण
मला राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार मिळाला, हा क्षण माझ्या आयुष्यातील सुवर्णाक्षरात लिहिण्याचा क्षण आहे. इतक्या वर्षांच्या मेहनतीचे फळ आज मला मिळाले. मला पुरस्काराचे पत्र मिळाल्यावर, मी माझ्या आईच्या हातात दिले. त्या वेळी तिच्या चेहºयावरचा आनंद बघून खूप खूश झाले. पुरस्काराच्या प्रक्रियेत माझ्या मुलीची खूप मदत झाली. तिच्यासाठीही हा पुरस्कार आहे. मला खूप आनंद झाला आहे.
- तृप्ती हातिस्कर,
शिक्षिका, प्रभादेवी प्राथमिक
मराठी शाळा क्रमांक २