गौरी टेंबकर-कलगुटकर,
मुंबई- वाकोल्यात एका उर्दू शाळेमध्ये १६ शाळकरी मुलींचा विनयभंग शिक्षकांनी केल्याचा आरोप स्थानिक नगरसेविकेने केला होता. मात्र आपली बदली रोखण्यासाठी एका शिक्षिकेने हा बनाव केल्याचे पोलीस सूत्रांचे म्हणणे आहे. त्यानुसार वाकोला पोलीस या प्रकरणी अधिक चौकशी करीत आहेत.वाकोल्याच्या उर्दू शाळेत विद्यार्थिनींचा विनयभंग झाल्याच्या वृत्तामुळे सर्वत्र खळबळ उडाली होती. हे प्रकरण अत्यंत संवेदनशील असल्यामुळे पोलिसांनी या प्रकरणाचा तपास अत्यंत सावधानता बाळगत सुरू केला. मात्र या आरोपात काही तथ्य नसून स्वत:ची बदली रोखण्यासाठी एका शिक्षिकेने केलेला हा बनाव असल्याचे पोलीस तपासात उघड झाले आहे. या प्रकरणी अद्याप एकाही पालकाने तक्रार केलेली नाही. या शाळेतील एका शिक्षिकेने बदली रोखण्यासाठी हे सर्व नाट्य घडवून आणल्याचे पोलीस तपासात उघड झाले आहे. पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, वाकोला शाळेतून संबंधित शिक्षिकेची बदली बीकेसी परिसरात केली जाणार होती. मात्र हे तिला मंजूर नसल्याने ती या शाळेतील काही मुलींच्या घरी गेली आणि तिने या दोन शिक्षकांविरुद्ध या मुलींना आरोप करण्यास सांगितले. त्यामुळे या शिक्षिकेने पोलिसांची दिशाभूल करीत दोन शिक्षकांवर खोटा आरोप केल्याचेही एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितले. एकाही पालकाची अद्याप तक्रार न आल्याने आम्ही या प्रकरणातील सत्यता पडताळून पाहत असल्याचे वाकोला पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक महादेव व्हावळे यांनी ‘लोकमत’ शी बोलताना सांगितले.।आरोपात काही तथ्य नाहीहे प्रकरण अत्यंत संवेदनशील असल्यामुळे पोलिसांनी या प्रकरणाचा तपास अत्यंत सावधानता बाळगत सुरू केला. मात्र या आरोपात काही तथ्य नसून स्वत:ची बदली रोखण्यासाठी एका शिक्षिकेने केलेला हा बनाव असल्याचे पोलीस तपासात उघड झाले आहे. या प्रकरणी अद्याप एकाही पालकाने तक्रार केलेली नाही.