मुंबई : कोकण, गोवा आणि मध्य महाराष्ट्रात शनिवारी (ता.२६) तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता आहे. तर, उर्वरित राज्यात हवामान कोरडे राहील. २७ ते २९ मार्चदरम्यान कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात हवामान कोरडे राहण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तविली आहे. त्यामुळे उन्हाचा पारा आता आणखी वाढणार असून, वाढत्या उन्हाच्या पाऱ्याने राज्य होरपळणार आहे.गेल्या २४ तासांत मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी पावसाची नोंद झाली. कोकण, गोवा, मराठवाडा आणि विदर्भात हवामान कोरडे होते. विदर्भात तुरळक ठिकाणी कमाल तापमानात सरासरीच्या तुलनेत लक्षणीय वाढ झाली आहे. कोकण, गोव्यात काही ठिकाणी व मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी कमाल तापमानात सरासरीच्या तुलनेत किंचित वाढ झाली आहे. उर्वरित राज्यात कमाल तापमान सरासरीच्या जवळपास नोंदविण्यात आले आहे. मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत उल्लेखनीय वाढ झाली आहे. विदर्भ आणि मराठवाड्यात बऱ्याच ठिकाणी व कोकण, गोव्यात तुरळक ठिकाणी किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत लक्षणीय वाढ झाली आहे. उर्वरित राज्यात किमान तापमान सरासरीच्या जवळपास नोंदविण्यात आले आहे.विदर्भ स्पेशलअकोला ४२.३, अमरावती ४०.२, बुलडाणा ३९.५, चंद्रपूर ४०.८, गडचिरोली ३६.२, गोंदिया ३८, नागपूर ३८.४, वर्धा ४०, वाशिम ४१, यवतमाळ ४०पाऱ्याची उसळीपरभणी ३९.७पुणे ३७.४सोलापूर ३९ठाणे ३९उस्मानाबाद ३८.९नांदेड ३९.४नाशिक ३७.८मुंबई ३३.१
उन्हाच्या चटक्याने राज्य होरपळणार; पारा आणखी वाढणार
By ऑनलाइन लोकमत | Published: March 26, 2022 8:45 AM