“१००हून जास्त श्रीसदस्यांचे मृत्यू, या पापाची जबाबदारी स्वीकारुन मुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्यावा”

By ऑनलाइन लोकमत | Published: April 19, 2023 03:27 PM2023-04-19T15:27:04+5:302023-04-19T15:28:13+5:30

Maharashtra Bhushan Award Heat Stroke: मुख्यमंत्री याला जबाबदार आहेत. कोणत्याही गोष्टीचा राजकीय इव्हेंट केल्याशिवाय त्यांना जमत नाही. ५ लाख देऊन हात झटकून चालणार नाही, अशी टीका सुषमा अंधारेंनी केली.

thackeray group leader sushma andhare said cm eknath shinde should resigns over maharashtra bhushan award heat stroke case | “१००हून जास्त श्रीसदस्यांचे मृत्यू, या पापाची जबाबदारी स्वीकारुन मुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्यावा”

“१००हून जास्त श्रीसदस्यांचे मृत्यू, या पापाची जबाबदारी स्वीकारुन मुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्यावा”

googlenewsNext

Maharashtra Bhushan Award Heat Stroke: खारघरमधील महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळ्यादरम्यान उष्माघाताने मृत्युमुखी पावलेल्या रुग्णांचा आकडा १४ वर पोहोचला आहे. तर, अद्यापही सात जणांवर तीन रुग्णालयांत उपचार सुरू आहेत. महाराष्ट्र भूषण पुरस्कार वितरण सोहळ्याला या घटनेमुळे गालबोट लागले. महाराष्ट्र भूषण पुरस्कारावेळी उष्माघाताने मृत्यू झालेल्या श्रीसदस्यांच्या संख्येवरून विरोधक सरकारवर सातत्याने टीका करत आहे. सरकार खरा आकडा लपवत आहेत, असा दावा विरोधकांकडून केला जात आहे. यातच आता  शिवसेना ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर हल्लाबोल करत राजीनाम्याची मागणी केली आहे. 

आप्पासाहेबांनी साधेपणाने कार्यक्रम करण्यासाठी सूचना केल्या असतील. मात्र, त्यांनी दिलेली वेळ घेतली म्हणत त्यांच्याबद्दल भाजप चुकीची माहिती देत आहे. मृतांचा आकडा लपवला गेला आहे. १०० हून अधिक मृत झाले असावेत, असा मोठा दावा करत, १६ कोटी खर्च करता तर अजून थोडे पैसे खर्च करून मांडव का उभे केले नाही, असा सवाल सुषमा अंधारे यांनी केला. आरोग्य विभागाला अगदी शेवटच्या वेळी कार्यक्रमाची कल्पना दिली गेली. स्वतंत्र रुग्णवाहिकेचा मार्ग केला नाही. अनुयायांना मतदार समजून मतावर डोळा ठेवत कार्यक्रम घेतला गेला. शिंदे फडणवीस यांनी खेळ केला आहे. भाजपचा कोणताही नेता या लोकांपर्यंत पोहोचले नाहीत. अमित शहा यांनीही मतांचे राजकारण केले, या शब्दांत सुषमा अंधारे यांनी निशाणा साधला. 

मुख्यमंत्री या घटनेला जबाबदार आहेत

मुख्यमंत्री या घटनेला जबाबदार आहेत. त्यांना कोणत्याही गोष्टीचा राजकीय इव्हेंट केल्याशिवाय जमत नाही. पाच लाख देऊन हात झटकून चालणार नाही. सर्वसामान्य लोकांचे सरकार म्हणता आणि पाच लाख देऊन हात झटकता, असा टोला लगावत हिंदुत्ववादी आणि आध्यात्मिक असाल, तर या पापाची जबाबदारी स्वीकारून मुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्यावा, असे आव्हान सुषमा अंधारेंनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दिले. 

दरम्यान, अजित पवारांनी भूमिका स्पष्ट केली आहे. यानिमित्ताने शिंदे गटाचे लोक उघडे पडले आहेत. महाविकास आघाडी अभेद्य आहे. आम्ही एकत्र निवडणुका लढवणार आहोत. अजितदादांची स्क्रिप्ट भाजपकडून लिहली गेली आहे. वज्रमुठ सभेला मिळणाऱ्या प्रतिसादानंतर भाजपकडून हे केले जात आहे. देवेंद्र फडणवीस यांचे मौन सगळे सांगून जाते. स्क्रिप्ट रायटर हे फडणवीस आहेत. मुद्दे डायव्हर्ट करणारे बालिश खेळ भाजपने बंद करावेत, अशी प्रतिक्रिया सुषमा अंधारे यांनी दिली. 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम" 

Web Title: thackeray group leader sushma andhare said cm eknath shinde should resigns over maharashtra bhushan award heat stroke case

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.