"...तोच प्रेक्षक म्हणतोय, आव्हाडांची काहीच चूक नव्हती, त्यांनी माझी मदत केली"; रोहित पवारांचा दावा
By ऑनलाइन लोकमत | Published: November 11, 2022 05:00 PM2022-11-11T17:00:08+5:302022-11-11T17:02:28+5:30
राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी सोमवारी काही कार्यकर्त्यांना सोबत घेऊन रात्री दहा वाजण्याच्या सुमारास विवियाना मॉलमध्ये हर हर महादेव चित्रपटाचा शो बंद पाडला होता. यावेळी चित्रपट पाहण्यासाठी आलेल्या एका प्रेक्षकास राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी मारहाण केली होती.
हर हर महादेव चित्रपटात छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल चुकीची माहिती दाखवली असल्याचा आरोप करत राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी सोमवारी काही कार्यकर्त्यांना सोबत घेऊन रात्री दहा वाजण्याच्या सुमारास विवियाना मॉल येथील शो बंद पाडला होता. यावेळी चित्रपट पाहण्यासाठी आलेल्या एका प्रेक्षकास राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी मारहाण केली होती. याप्रकरणी मंगळवारी ठाण्यातील वर्तकनगर पोलीस ठाण्यात जितेंद्र आव्हाडांसह 100 कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. यानंतर आज, वर्तकनगर पोलिसांनी आव्हाडांना अटक केली आहे. या संपूर्ण प्रकरणावर, आता आमदार रोहित पवार यांनी एक ट्विट करत मोठा दावा केला आहे.
"ज्या प्रेक्षकाला मारहाण झाल्याचा आरोप करण्यात आला तोच प्रेक्षक म्हणतोय की, “आव्हाड साहेबांची काहीच चूक नव्हती, उलट त्यांनी माझी मदत केली, त्यांना पोलिसांनी जाणून बुजून अटक केली आहे”. यावरून भाजपचा खरा चेहरा समोर आला आहे," असे ट्विट रोहित पवार यांनी केले आहे.
ज्या प्रेक्षकाला मारहाण झाल्याचा आरोप करण्यात आला तोच प्रेक्षक म्हणतोय की, “आव्हाड साहेबांची काहीच चूक नव्हती, उलट त्यांनी माझी मदत केली, त्यांना पोलिसांनी जाणून बुजून अटक केली आहे”. यावरून भाजपचा खरा चेहरा समोर आला आहे. pic.twitter.com/QIAmdswMST
— Rohit Pawar (@RRPSpeaks) November 11, 2022
यालाच जोडून आणखी एक ट्विट करत, "सार्वजनिक ठिकाणी गोळीबार करणाऱ्यांना, जादूटोणा कायद्याला आव्हान देणाऱ्यांना मोकळं सोडायचं आणि छत्रपतींचा खोटा इतिहास दाखवणाऱ्या चित्रपटाला विरोध करणाऱ्या @Awhadspeaks साहेबांना अटक करायची ही या नव्या सरकारची कायदा-सुव्यवस्था आहे का?" असा प्रश्नही रोहित पवार यांनी केला आहे.
फाशी दिली तरी चालेल, पण...-
अटकेनंतर एक ट्विट करत, "हा पोलीसी बळाचा गैरवापर आहे. आता मी लढायला तयार आहे. फाशी दिली तरी चालेल. पण, मी जे केलेलं नाही, तो गुन्हा मी कबूल करणार नाही," असे आव्हाड यांनी म्हटले आहे.