मुंबई - दिवसभर वैद्यकीय क्षेत्रातल्या तज्ज्ञांच्या बैठका, आरोग्य विभागातल्या अधिकाऱ्यांशी चर्चा, पत्रकार परिषदा अशा व्यस्त वेळापत्रकामुळे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची सध्या दमछाक होतेय. त्यांच्या मदतीला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे देखील सातत्याने कोरोनाचे संकट परतावून लावण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत. मात्र उद्धव ठाकरे यांना अनुभव नसल्याचा दावा करत भाजपकडून त्यांच्यावर टीका करण्यात आली. त्याला युवासेनेचे वरुण सरदेसाई यांनी चोख प्रत्युत्तर दिले आहे.
आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्यासह मुख्यमंत्री उद्धव ठाकरे कोरोनाच्या प्रादुर्भावासून महाराष्ट्राला वाचण्यासाठी झटत आहेत. मात्र, भाजप नेते आमदार निरंजन डावखरेंनी ट्विट करुन वादाला तोंड फोडले आहे.
सध्या महाराष्ट्राला शून्य प्रशासनाचा अनुभव असणाऱ्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची नाही, तर आपत्ती व्यवस्थापनात अनुभवी असणाऱ्या प्रशासकाची म्हणजेच देवेंद्र फडणवीस यांची गरज आहे, असे ट्विट डावखरे यांनी केले होते. डावखरेंच्या या ट्विटचा नेटीझन्सने चांगलाच समाचार घेतलायच. आता शिवसेना देखील मैदानात उतरली आहे.
डावखरेंच्या ट्विटला प्रत्युत्तर देताना वरुण सरदेसाई यांनी भाजपवर घणाघाती टीका केली. निरंजन डावखरे सारख्या नेत्यांचे 'क्वाराटाईन' अर्थात विलगीकरण करायला हवे. शहानपणाच नसेल तर शिक्षणाचा काय उपयोग. आपत्ती व्यवस्थापनाचा एवढा अनुभव आहे तर मग तुमच्या नेत्याला कोरोनाबधीत वुहान, इटली किंवा स्पेनमध्ये घेऊन जाण्याचा सल्ला सरदेसाई यांनी भाजपला दिला.