राफेल विमान खरेदीत कोणताही घोटाळा नाही : व्ही. के. सिंग 

By ऑनलाइन लोकमत | Published: February 13, 2019 01:37 PM2019-02-13T13:37:56+5:302019-02-13T19:20:28+5:30

हत्यारे , विमाने खरेदी करण्याची एक प्रक्रिया असते. त्यानुसारच ही प्रक्रिये संदर्भात कार्यवाही केली जाते. 

There is no scam in buying Rafael aircraft : V.k.Sing | राफेल विमान खरेदीत कोणताही घोटाळा नाही : व्ही. के. सिंग 

राफेल विमान खरेदीत कोणताही घोटाळा नाही : व्ही. के. सिंग 

Next

पुणे: राफेल खरेदी व्यवहारावरून करण्यात येत असलेले सर्व आरोप त्यामुळेच खोटे आहेत. सन २०१० मध्ये खरेदीचा प्रस्ताव होता. तत्कालीन सरकारने ते काही स्टेप्स पुढे नेला व अचानक थांबवला. सैन्य कितीकाळ थांबू शकते याला काही मर्यादा आहेत. विद्यमान सरकारने तो पुर्ण केला. या व्यवहारातील रिलायन्स कंपनी फ्रान्सने पसंत केली आहे. भारत सरकारचा त्यात काहीही संबध नाही.असे प्रतिपादन माजी लष्करप्रमुख तसेच विद्यमान परराष्ट्र व्यवहार मंत्री व्ही. के. सिंग यांनी केले.
एका कार्यक्रमासाठी म्हणून सिंग पुण्यात आले होते. ते म्हणाले,राफेल करारात काहीही नियमबाह्य नाही. सैन्याच्या कोणत्याही व्यवहारावरून राजकारण करणे चुकीचे आहे. सैन्यदलासाठी कोणतीही खरेदी करताना अनेक गोष्टी पाहिल्या जातात. ती संपुर्ण प्रक्रियाच गुंतागुंतीची आहे. त्यात काहीही हस्तक्षेप करणे, किंवा प्रक्रियेतील एखादी चाचणी वगळणे कोणालाही शक्य नाही. विदेशाबरोबर संबध हे आपल्या देशाचे हित कशात आहे त्यावर अवलंबून त्या देशाचे दुसऱ्या देशाशी संबध कसे आहेत असे सिंग यांनी सांगितले. 

Web Title: There is no scam in buying Rafael aircraft : V.k.Sing

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.