शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Assembly Election Result 2024: ठाकरे गटाच्या गटांगळ्या! ठाणे-कोकणच्या गडाला खिंडार, शिंदेसेनेपुढे जिंकला फक्त एक आमदार
2
Baramati Vidhan Sabha Election Result 2024 Live : बारामतीचे 'दादा' अजित पवारच! पुतण्याला चितपट करत साकारला ऐतिहासिक विजय
3
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights : "बहि‍णींनी असा अंडर करंट दाखवला की सगळे उताणे पडले"; विजयानंतर अजित पवारांचा टोला
4
'ओ स्त्री! रक्षा करना', राजकारणातील सर्वाधिक पावरफुल मंत्र ठरला; एकामागोमाग एक सरकारे वाचली
5
मालाड पश्चिममध्ये अस्लम शेख यांच्याकडून आशिष शेलारांच्या भावाचा पराभव; सलग चौथ्यांदा विजय
6
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights : महायुतीचा मुख्यमंत्री कोण?; खुद्द देवेंद्र फडणवीसांनीच दिलं सगळ्यांच्या मनातल्या प्रश्नाचं उत्तर
7
Yevla Vidhan Sabha Election Result 2024 Live : छगन भुजबळांनी येवल्याचा गड राखला; २६०५८ मतांनी विजयी, शिंदे पराभूत 
8
Maharashtra Assembly Election Result 2024: वर्सोव्यात शिवसेना उबाठाच्या हारुन खान यांचा विजय, भाजपच्या भारती लव्हेकरांचा १६०० मतांनी पराभव
9
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 Live: 'अजित पवार पिछाडीवर', अशी खोटी बातमी का दाखवता? अजित पवारांचा सवाल
10
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights : "महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होणार देवेंद्र फडणवीस!"; आई सरिता फडणवीस यांचं मोठं विधान
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results : जतमध्ये फडणवीसांच्या शिलेदाराने गड खेचून आणला; गोपीचंद पडळकरांचा मोठा विजय
12
"हा महायुतीच्या एकजुटीचा विजय, जनतेसमोर नतमस्तक", देेवेंद्र फडणवीस यांची प्रतिक्रिया
13
Mahim Vidhan Sabha Election Result 2024 Live : "एक धनवान अन् एक राजपुत्र, त्यांच्या..."; विजयानंतर महेश सावंतांची पहिली प्रतिक्रिया
14
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights : "आम्ही आधुनिक अभिमन्यू, चक्रव्यूह तोडून दाखवला"; एकहाती विजयानंतर फडणवीसांची प्रतिक्रिया
15
अहिल्यानगर जिल्ह्यात महाविकास आघाडीतील दिग्गजांना पराभवाचा धक्का! थोरात, गडाख, तनपुरे, भांगरे पराभूत
16
Sangamner Vidhan Sabha Election Result 2024 Live : बाळासाहेब थोरातांना पराभवाचा धक्का; नवखे अमोल खताळ ठरले जायंट किलर
17
Anushakti Nagar Vidhan Sabha Result 2024: स्वरा भास्करचा पती फहाद अहमद विरुद्ध सना मलिक, निकाल काय?
18
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: संस्थान खालसा! विनोद तावडेंना घेरणारे हितेंद्र, क्षितिज ठाकूर पडले; वसई-विरारमध्ये ‘कमळ’ फुलले!
19
भाजपच्या प्रशांत बंब यांचा विजयाचा चौकार; गंगापूरमधून सलग चौथ्यांदा विजयी...
20
Maharashtra Assembly Election Result 2024: अंधेरी पूर्वेत शिवसेनेच्या मुरजी पटेलांची बाजी, उबाठाच्या ऋतुजा लटकेंचा पराभव 

या आहेत जनता जनार्दनाच्या अपेक्षा; नेत्यांना आता आश्वासन पूर्ण करा

By ऑनलाइन लोकमत | Published: October 27, 2019 1:32 AM

निवडणुकीत निवडून येण्यासाठी पक्ष तसेच उमेदवारांकडून वाट्टेल ती आश्वासने दिली जातात. ती प्रत्यक्षात आणणे शक्य आहे की नाही, याचा विचार केलेला नसतो

राज्यघटनेचा आदर करासत्तेवर आलेल्या कोणत्याही सरकारने काम करताना जात किंवा धर्म याला प्राधान्य न देता घटनेने जे अधिकार दिले आहेत व जी बंधने घातली आहेत त्यानुसारच कारभार करावा. जनतेमध्ये जातीय किंवा धार्मिक तणाव वाढेल अशी कृती करू नये. शेजारच्या राष्टÑांबद्दल चिथावणीखोर भाषा वापरून त्यांना डिवचू नये. - तात्याबा गणपती जाधवर, खेडशिवापूर, ता. हवेली, जि. पुणेरोजगारनिर्मिती करानिवडून येण्यासाठी नेतेमंडळींकडून अवास्तव आश्वासने दिली जातात; जी कधीच सत्यात उतरत नाहीत हे राज्यातील सर्व जनतेला ठाऊक आहे. सत्तेवर येणाऱ्यांनी लोकांना पाच-दहा रूपयात जेवण नाही दिले तरी चालेल पण बेरोजगारांना बारमाही रोजगार मिळेल एवढे पाहावे. महागाईवर अंकुश ठेवावा, शेतक-यांच्या प्रश्नांकडे गांभिर्याने लक्ष देवून त्यांच्या आत्महत्येचे प्रमाण कमी होईल, यासाठी प्रयत्न करावेत. रस्ते, पाणी, निवारा, आरोग्य या समस्याही आहेतच.- मुरलीधर हरिश्चंद्र धंबा, २९, गणेशछाया, आनंदनगर, डोंबिवली (पश्चिम), जि. ठाणे.बेरोजगार भत्ता द्याशेतकऱ्यांना सरकटक कर्जमाफी द्यावी. पदवी पर्यंत मोफत शिक्षण द्यावे. उच्च शिक्षणसाठी शिष्यवृत्तीत वाढ व व्याजदर कमी करण्यासाठी प्रयत्न करावेत. मराठा समाजाला मिळालेले आरक्षण केंद्रात लागू करण्यासाठी सातत्याने पाठपुरावा करावा. महिला संरक्षण कायदे अधिक कठोर करावेत. लघु उद्योग लहान व्यापारी यांना जीएसटीमधून वगळावे. सिंचनाच्या सोयी उपलब्ध करुन द्याव्यात. उत्पादन खर्चावर आधारित हमीभाव द्यावा. सुशिक्षित बेरोजगार युवकांना बेकार भत्ता देण्यात यावा - गणेश सूर्यभान शिंदे, शिरूर कौठा,कंधार, जी. नांदेड.कुटीर उद्योगधंदे बंद पाडू नकानवीन सरकारने सर्वप्रथम राज्यातील लघु व कुटीर उद्योगधंदे बंद पडणार नाहीत याची दक्षता घेऊन बेरोजगारी कमी करण्यासाठी प्रयत्न व्हावा. शेतकºयांना व ग्रामीण भागाला केंद्रस्थानी ठेवून धोरणे राबवली जावीत. शिक्षणाचे बाजारीकरण थांबवून ते गुणवत्तापूर्ण करण्याचे प्रयत्न व्हायला हवेत. शासकीय कार्यालयातील सामान्य नागरिकांची कामे जलदगतीने व्हावीत. या बाबींची तातडीने अंमलबजावणी करावी. - प्रा. डॉ. नरहरी पाटील, जवाहरलाल नेहरू समाजकार्य महाविद्यालय, नांदेड.डेंग्यू, स्वाइन फ्लू नियंत्रित कराराज्यात पुन: भाजप-सेनेचे सरकार स्थापन होण्यासाठी रयतेने आपली मोहर उमटवली आहे. सरकारने आता आपल्या कर्तव्यपरायणतेचे कमळ फुलवावे. १० रुपयांमध्ये सकस भोजन, स्वस्त वीज आणि एक रूपयात आरोग्य तपासणी, यांची पूर्तता व्हावी. एकाने सवंग आश्वासन द्यायचे आणि दुसºयाने आम्ही त्यातले नाही म्हणत विकासाचे दार बंद करून घ्यायचे, अशा या रंगलेल्या उंदरामांजराच्या खेळात, गरीब बिचारा मतदाता भरडला जाणार नाही, हे पहावे. राज्यभरात डेंग्यू बरोबरच स्वाईन फ्लूची साथ पसरली असून ती तातडीने आटोक्यात आणावी. दुसरीकडे कचºयाची समस्या वाढत असून त्याबद्दल कोणीच चकार शब्द काढत नाही. ‘मतलबी राजा अन परावलंबी प्रजा’ हे चित्र आता बदलले पाहिजे. - डॉ. नूतनकुमार सी. पाटणी, चिकलठाणा, औरंगाबाद.राज्याचा शैक्षणिक दर्जा उंचावण्यासाठी प्रयत्न कराजिंकून आल्यानंतर सत्तेवर येणाºया नेतेमंडळींना जनतेला दिलेल्या आश्वासनांचा विसर पडतो, असा आजपर्यंतचा अनुभव आहे. तसे आता व्हायला नको. आज महाराष्ट्रात शेतकºयांच्या आत्महत्येचा प्रश्न ऐरणीवर आहे. अनिश्चित पावसामुळे उभी पिके नष्ट झाली. त्यामुळे शेतकºयांचे प्रश्न सोडवून त्यांना दिलासा देण्याचा प्रयत्न करायला हवा. बेकारी व गरिबीचा प्रश्न आ वासून उभा आहे. त्यासाठी कौशल्यपूर्ण शिक्षण देण्याची खरी गरज आहे. विदर्भ व मराठवाड्यात दीर्घ उद्योगांची वानवा आहे. लघु व कुटीर उद्योगांना प्राधान्य दिल्यास कारागिरांच्या कौशल्याला वाव मिळून अनेकांना रोजगार उपलब्ध होईल. शिक्षणव्यवस्थेत सातत्याचा अभाव आहे. शिक्षण विभाग रोज नवीन नवीन आदेश निर्गमित करत असल्यामुळे अनेक आव्हाने आज शिक्षक व पालकांसमोर निर्माण होत आहेत. रोजगार निर्माण करणारे शिक्षण देण्याºया संस्था व विद्यापीठांचा शैक्षणिक दर्जा उंचाविण्याची गरज आहे. पूर्व प्राथमिक शिक्षणापासून तर महाविद्यालयिन शिक्षक, वैद्यकीय शिक्षणाकडे विशेष लक्ष देण्याची गरज आहे. - प्रा. डॉ सुधीर अग्रवाल, एस. के. पोरवाल महाविद्यालय कामठी, नागपूर.लोकशाही मूल्यांची जपणूक करासरकार, कर्तव्य, जागरूक नागरिक या संकल्पना अस्तित्वात तिथे असतात जिथे लोकशाही तिच्या सुदृढ अवस्थेत असते. या निवडुणकांचा अभ्यास करत असताना एक गोष्ट प्रकर्षाने जाणवली. ती ही की, लोकशाही मूल्ये, प्रामाणिकपणा, निष्ठा या माणूस म्हणून जगण्यासाठी उपयोगी असणाºया मूल्यांचा जसा ºहास होतोय तसाच पैसे देऊन मत विकत घेणं, प्रलोभनं दाखवणं , तरुणांना चुकीच्या पद्धतींने प्रोत्साहित करणं ह्या सर्वच लोकशाही विरोधी घातक तत्त्वांचा पायंडा पडत चालला आहे. अशा अवस्थेतून तयार होणारे नवीन सरकार जे याच प्रक्रियेतून उदयाला आले आहे. त्यांच्याकडून सकारात्मकतेची अपेक्षा आहे. निवडणुका, राजकारण, त्याच्यासाठी तरुण पिढीचा वापर, एकमेकांविषयी वाढत जाणारी कमालीची वैरभावना, दुस्वास, सूड ह्या सगळ्या विघातक मूल्यांच्या मुसक्या सरकार आवळणार आहे की नाही? सहिष्णुता, संवेदनशीलता, प्रेम, आपुलकी ह्या सगळ्याच मूलभूत मूल्यांची शिकवणी किती दिवस फक्त पाठ्यपुस्तकांतूनच मिळणार? सगळ्यांच्या आचरणातून ते दिसावेत. गलिच्छ राजकारण, त्याच पिचलेल्या मानसिकतेतून लढल्या जाणाºया निवडणूका, त्यातून पसरत जाणारा द्वेष, तिढा या सगळ्याचा उबग आलाय. एका शिस्तबध्द पातळीवर जाऊन आपण निवडणूक, सरकार, राजकारण नाही का करू शकत? इतर भौतिक सोयी- सुविधा, अन्न, वस्त्र, निवारा ह्या मूलभूत गरजा अशा रुळलेल्या सगळ्या मागण्या सगळेच करतील पण प्रत्येक निवडणुकांपायी वाढत जाणारा द्वेष, मत्सर, निष्ठा व प्रामाणिकपणा यांचा बळी, पैशाची वारेमाप उधळण करत मतं विकत घेण्याची प्रवृत्ती, खालच्या थराला पोहोचलेलं राजकारण, वाढती असहिष्णुता, मतांसाठी विकलं जाणं, त्यासाठी पैसा घेणं हा माझा अधिकार आहे अशा आशयाच्या वाढत चाललेल्या विघातक मनोवृत्ती या सगळ्याचा सखोल विचार, येणारं कुठलंही, कुणाचंही सरकार करणार असेल तर एक सामान्य माणूस म्हणून जगायलापोषक वातावरण निर्माण होईल आणि हेच यश इतर कुठल्याही यशापेक्षा मोलाचं ठरेल. कारण ते शाश्वत व चिरकाल टिकणारं असेल. एवढीच मूलभूत आणि रास्त अपेक्षा आहे माझी. - निराद विनय जकातदार , सौ. सु. गि. पाटील न्यू इंग्लिश स्कूल, भडगाव, जि.जळगाव.

परप्रांतीयांच्या लोंढ्यावर नियंत्रण आणाराज्यात सत्तेत येणाऱ्या नवीन सरकारने महाराष्ट्रात विशेषत: मुंबई, पुण्यात येणाºया परप्रांतियांच्या लोंढ्यांवर नियंत्रण आणायला हवे.वाढती महागाई, भरमसाठ वाढणारी लोकसंख्या याबाबत देखील तातडीने पावले उचलण्याची गरज आहे. पोलिसांनी नागरिकांशी नीट बोलावे, सरकारी कार्यालयांमधून देखील सर्वसामान्य जनतेला आदराची वागणूक दिली जावी. - योगेश शिगवण, लाला वझीर चाळ, भांडुप (प.)महाराष्ट्र गरिबीमुक्त करामहाराष्ट्रातील रेल्वे स्टेशन्स, बसस्थानके, धार्मिक स्थळे ही भिकारी, अनाथ, गुंड लोकांची आश्रयस्थाने आहेत. आपण आधुनिक युगामध्ये वावरत असताना व विकासाचा टेंभा मिरवताना या गंभीर प्रश्नाकडे दुर्लक्ष करीत आहोत. परदेशी पर्यटक येतात व आपल्याकडील सार्वजनिक ठिकाणी असलेल्या या भिकारी लोकांचा वावर कॅमेºयात कैद करून आपली इभ्रत धुळीला मिळवतात.गोरगरीब जनतेला सरकार आपले वाटले पाहिजे. नोकरवर्गाला वेतनआयोग आहे. असंघटित वर्गाला मात्र विषप्रयोग आहे. मतांच्या लालसेपोटी सर्वजण निर्णय घेतात. गरिबी हटाव ही काँग्रेसने काही वर्षांपूर्वी घोषणा दिली. काँग्रेस हटली, परंतु गरिबी हटली नाही. सार्वजनिक ठिकाणी असलेल्या अनाथ, भिकारी, गर्दुल्ले, चोर,गुंड, गुन्हेगार यांची तपासणी करून अनाथांसाठी शिक्षण, कामाची व राहण्याची सोय करावी, गुंड व गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांना तुरूंगात पाठवावे, जेणेकरून सार्वजनिक ठिकाणी स्वच्छता राहील. महाराष्टाची निर्मिती होऊन ६० वर्ष होत आलीत पण राज्यकर्ते गरिबांकडे दुर्लक्ष करीत आहेत. बेघरांची संख्या कमी होत नाही. रोजगार उपलब्ध नसल्यामुळे गरीबी वाढत चालली आहे. आगामी काळात गरिबी निर्मुलनासाठी सरकारने ठोस पावले उचलावीत. - अशोकराव टाव्हरे, साई आनंद रेसीडेन्सी, वाफगाव रोड, राजगुरुनगर, जि. पुणे.अंधश्रद्धांच्या निर्मूलनासाठी विज्ञानवादी शिक्षण द्याआज जे पुरातनवादी शिक्षण आहे त्या ऐवजी विज्ञानवादी शिक्षण देऊन समाजातील अंधश्रध्दा, अंधविश्वास यांचे निर्मूलन करण्यासाठी हातभार लावावा. सर्वसामान्यांचे आरोग्य नीट राहण्यासाठी पिण्याचे शुध्द पाणी, कोलमडलेल्या आरोग्य सेवेत सुधारणा करावी. शासकीय कार्यालयात होणारी जनतेची ससेहोलपट थांबवावी. भ्रष्टाचार थांबवून कर्मचाऱ्यांच्या कामाचे मूल्यमापन करावे. जे उद्दोग बंद पडले आहेत ते सुरु करावेत. नवीन उद्योगांना चालना देऊन बेरोजगार तरुणांना रोजगाराची संधी उपलब्ध करुन द्यावी. ज्यामुळे महाराष्ट्राची बिघडलेली आर्थिक घडी सुधारण्यास मदत होईल. - विश्वासराव पाटील, धानोरा(वि) ता.नांदुरा, जि. बुलडाणा.आश्वासने पाळानिवडणुकीत निवडून येण्यासाठी पक्ष तसेच उमेदवारांकडून वाट्टेल ती आश्वासने दिली जातात. ती प्रत्यक्षात आणणे शक्य आहे की नाही, याचा विचार केलेला नसतो. प्रत्यक्ष निवडून आल्यावर दिलेल्या आश्वासनांची अमलबजावणी करणे कठीण असल्याचा साक्षात्कार होतो. परंतु त्यामुळे जनतेशी आपण प्रतारणा करीत आहोत याचे कोणालाच सोयरसुतक नसते. त्यामुळे सत्तेवर येणाºयांनी निवडणुकीत जनतेला दिलेल्या आश्वासनांची अमलबजावणी करावी. रस्ते, पाणी याशिवाय विद्यार्थ्यांच्या पाठीवरचे ओझे कमी करावे. आता हिंदू-मुस्लीम, भारत-पाकिस्तान असले विषय बंद करुन आपल्या मूलभूत समस्या सोडवण्याकडे लक्ष द्यावे. - एम.सी जैन, पाटणी निवास, मेन रोड, चिकलठाणा, औरंगाबाद.आपत्ती व्यवस्थापनासाठी यंत्रणा उभारावीआपत्ती व्यवस्थापन करण्यासाठी प्रथम मोठी व्यवस्था उभारण्यात यावी. कारण छोट्या नैसर्गिक आपत्तीसमोरही सगळे हतबल झालेले दिसले. महिला अत्याचार, मंदी, बेरोजगारी, आरोग्यसेवा, शेतकºयांचे कर्ज हे प्रश्न तातडीने सोडवावेत. वीज, वाहतूक व्यवस्था, मोबाईल टॉवर यासारख्या मुलभूत सुविधा उपलब्ध करण.े आरोग्य केंद्रे आहेत पण डॉक्टर नाहीत, नळ कनेक्शन आहे पण पाणी नाही, ही परिस्थिती बदलावी, यासाठी योजना राबवाव्यात. स्मार्ट सिटीपेक्षा ‘सर्वसोयीयुक्त ग्राम’ अशी योजना तयार करावी. उद्योगाची जोखीम शासन घेते तशी शेतीचीही घ्यायलाच हवी. ग्रामीण भागात रोजगार निर्मिती करावी - अनिल बबन सोनार, उपळाई बुद्रुक, ता. माढा - सोलापूर.मेगाभरती आता तरी करारोजगार नसल्याने राज्यातील तरुण नैराश्याच्या गर्तेत अडकला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सरकारी सेवेत ७२ हजार कर्मचाºयांची भरती करण्याचे दिलेले आश्वासन देखील हवेतच विरले आहे. हे आश्वासन सरकारने यावेळी तरी पूर्ण करावे. राज्यातील ४० टक्के लोकसंख्या ही १८ ते ४० या वयोगटातील आहे. या तरुणांमध्ये प्रचंड ऊर्जा आहे, मेहनत करण्याची तयारी आहे. त्यांच्या मेहनतीचा आणि ऊजेर्चा सरकारने उपयोग करुन घेतल्यास महाराष्ट्र देशातील नंबर एकचे राज्य बनेल, यात शंका नाही. - श्याम बसप्पा ठाणेदार,दौंड, जि. पुणे.