यंदापासून विद्यापीठात ७५:२५ फॉम्युर्ला
By admin | Published: June 4, 2014 10:11 PM2014-06-04T22:11:37+5:302014-06-04T22:51:13+5:30
विद्यार्थी, प्राध्यापकांकडून विरोध वाढल्यानंतर मुंबई विद्यापीठाने दोन वर्षांपुर्वी सुरु केलेल्या क्रेडिट ग्रेडिंग पद्धतीत बदल केला आहे.
मुंबई : विद्यार्थी, प्राध्यापकांकडून विरोध वाढल्यानंतर मुंबई विद्यापीठाने दोन वर्षांपुर्वी सुरु केलेल्या क्रेडिट ग्रेडिंग पद्धतीत बदल केला आहे. त्यानुसार चालू शैक्षणिक वर्षांपासून कला, वाणिज्य, विज्ञान शाखांसाठी ७५:२५ फॉम्युर्ला लागू करण्यात आला आहे. याबाबतचे परिपत्रक विद्यापीठाने बुधवारी जारी केले आहे.
विद्यापीठाने विविध शाखांसाठी दोन वर्षांपुर्वी क्रेडिट ॲण्ड ग्रेडिंग पद्धत लागू केली होती. त्यानुसार ६०: ४० च्या फॉम्युर्लानुसार परीक्षा घेण्यात येत होती. मात्र विद्यार्थी आणि प्राध्यापकांनी या पद्धतीला तीव्र विरोध केल्याने विद्यापीठाने ७५:२५ चा नवा फॉम्युर्ला व्यवस्थापन परिषदेत मंजूर करुन घेतला. हा फॉम्युर्ला चालू शैक्षणिक वर्षापासून लागू करण्यात येणार आहे. याबाबतचे परिपत्रक विद्यापीठाने जारी केले आहे. या नियमानुसार ७५ गुणांची विद्यापीठामार्फत घेण्यात येणारी परीक्षा आणि अंतर्गत मुल्यमापनाच्या २५ गुणांपैकी २० गुण लेखी परीक्षा आणि ५ गुण विद्यार्थ्यांची वर्गातील उपस्थिती व वागणुकीसाठी देण्यात येणार आहेत.