लोकशाहीच्या रक्षणासाठी लढा उभारण्याची वेळ- बाळासाहेब थोरात

By ऑनलाइन लोकमत | Published: August 10, 2020 02:37 AM2020-08-10T02:37:43+5:302020-08-10T02:37:54+5:30

ऑगस्ट क्रांती दिनी हुतात्म्यांना अभिवादन

Time to fight for the democracy says congress leader Balasaheb Thorat | लोकशाहीच्या रक्षणासाठी लढा उभारण्याची वेळ- बाळासाहेब थोरात

लोकशाहीच्या रक्षणासाठी लढा उभारण्याची वेळ- बाळासाहेब थोरात

Next

मुंबई : स्वातंत्र्यानंतर काँग्रेस पक्षाने देशात लोकशाही रूजवली. मात्र, केंद्रातील भाजप सरकार संविधानाला पायदळी तुडवून देशात हुकूमशाही आणण्याचा प्रयत्न करत आहे. संविधानाच्या रक्षणासाठी १९४२ च्या लढ्याप्रमाणे पुन्हा लढा देण्याची वेळ आली आहे, काँग्रेस कार्यकर्त्यांनी त्यासाठी सज्ज राहावे, असे आवाहन प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष आणि राज्याचे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी रविवारी केले.

आॅगस्ट क्रांती लढ्याला ७८ वर्षे पूर्ण झाली. यानिमित्ताने प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष आणि राज्याचे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी आॅगस्ट क्रांती मैदानातील हुतात्मा स्तंभाला पुष्पचक्र अर्पण करून हुतात्म्यांना अभिवादन केले.

या वेळी राज्याचे सार्वजनिक बांधकाममंत्री अशोक चव्हाण, मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष एकनाथ गायकवाड, प्रदेश काँग्रेसचे कार्याध्यक्ष मुजफ्फर हुसेन, शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड, माजी मंत्री नसीम खान, सुरेश शेट्टी, आमदार भाई जगताप, झिशान सिद्दिकी, माजी आमदार मधू चव्हाण, सरचिटणीस मोहन जोशी यांच्यासह काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

या वेळी थोरात म्हणाले की, १९४२ रोजी आजच्या दिवशी महात्मा गांधी यांनी मुंबईच्या ऐतिहासिक आॅगस्ट क्रांती मैदानातून ‘अंग्रेजो चले जावो, भारत छोडो’चा नारा दिला होता. त्यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत जात, धर्म, प्रांत विसरून देशातील लाखो लोक या लढ्यात सहभागी झाले. ज्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने १९४२ च्या लढ्याला विरोध केला, त्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या आदेशाने केंद्रातील भाजप सरकार चालते, असे थोरात म्हणाले.  

Web Title: Time to fight for the democracy says congress leader Balasaheb Thorat

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.