टेकड्यांवर टिप्परने मलबा टाकणे सुरूच

By admin | Published: August 13, 2014 12:43 AM2014-08-13T00:43:45+5:302014-08-13T00:43:45+5:30

दरड कोसळण्याच्या घटना सातत्याने वाढत आहेत. बाळापूर गावाजवळ हाकेच्या अंतरावर महाकाय दगड-मातीची टेकडी तयार झाली आहे. परंतु गावाच्या सुरक्षिततेकरिता बांधण्यात आलेली संरक्षक भिंत केवळ

Tips to debris with tips on the hills | टेकड्यांवर टिप्परने मलबा टाकणे सुरूच

टेकड्यांवर टिप्परने मलबा टाकणे सुरूच

Next

नंदू परसावार/मोहन भोयर - भंडारा
दरड कोसळण्याच्या घटना सातत्याने वाढत आहेत. बाळापूर गावाजवळ हाकेच्या अंतरावर महाकाय दगड-मातीची टेकडी तयार झाली आहे. परंतु गावाच्या सुरक्षिततेकरिता बांधण्यात आलेली संरक्षक भिंत केवळ अडीच ते तीन फुटांचीच आहे. दरड कोसळली तर या भिंतीपासून गावाचे संरक्षण कसे होणार, हा प्रश्न कायम असतानाही या टेकडीवर रोज टिप्परने माती व दगड टाकणे सुरूच आहे. परिणामी मलब्यासह दगड खाली घसरत असून शेतात दगड जमा झाले आहेत.
अंतर्गत रस्ते चिखलमय
गोबरवाही येथून चार कि.मी. अंतरावर बाळापूर मँगनिज खाण आहे. येथील डांबरी रस्त्यांवर जागोजागी पडलेले खड्डे चिखलाने तुडुंब भरले आहेत. खाणीनंतर बाळापूर गावाकडे जाणारा रस्ता निमुळता व धोकादायक आहे. या रस्त्यावरच खुली खाण असून संरक्षक भिंत नाही. खाणीत डोकावून पाहिले तर भोवळ यावे अशी स्थिती आहे. या खाणीजवळ कुणालाही जाता येते. प्रतिबंधित क्षेत्रात सहज जाता येणारी कदाचित ही पहिली खाण असावी.
मॉईलने केले अतिक्रमण
खाण प्रशासनाने आदिवासी शेतकऱ्यांच्या जमिनीवर अतिक्रमण करणे सुरू केले आहे. खाणीतील मलबा शिवराज उईके यांच्या रिकाम्या शेतात टाकण्यात येत आहे. परंतु ज्यांची त्या जमिनीवर मालकी आहे त्या शेतकऱ्यांना मोबदला दिलेला नाही. नियमानुसार त्या कुटुंबातील एकाला नोकरी देणे बंधनकारक आहे. परंतु नोकरी अद्याप दिली नाही. यावेळी उईके म्हणाले, आमच्या चार एकर शेतीत खाणीतला मलबा जमा झाला आहे. नोकरीही देत नाही आणि मोबदलाही देत नाही. अशा स्थितीत व्यथा सांगायची कुणाला, असा त्यांचा प्रश्न होता. यासंदर्भात मॉईल व्यवस्थापक यु.आर. सिंग यांना विचारले असता उईके हे आदिवासी प्रवर्गात येत असल्यामुळे त्यांच्या जमिनीची रजिस्ट्री होऊ शकत नाही. त्याकरिता मंत्रालयातून परवानगी आणावी लागते असे त्यांनी सांगितले.
रुग्णांची संख्या अधिक
बाळापूर परिसरातील भुगर्भात मँगनिज आहे. त्यामुळे विहिरीच्या पाण्यात मँगनिजसह लोहकण, फ्लोरोसिसचे प्रमाण अधिक आहे. या पाण्यामुळे येथे अनेकांना आजाराने ग्रासले आहे. ब्लास्टिंग झाल्यानंतर या परिसरात प्रचंड धूळ असते. श्वासाद्वारे धूलिकण शरीरात जात असल्यामुळे श्वसनाचे विकारही वाढले आहेत.

Web Title: Tips to debris with tips on the hills

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.