मद्याप्रमाणो तंबाखूलाही 25 वर्षाची वयोमर्यादा?

By admin | Published: June 8, 2014 12:36 AM2014-06-08T00:36:39+5:302014-06-08T00:36:39+5:30

सिगारेटच्या किमती 1क् टक्के वाढवून एकीकडे या व्यसनाला आळा घालत असतानाच महसूल वाढविण्याचा सरकारचा प्रयत्न राहणार आह़े

Tobacco drinker age 25 years of age? | मद्याप्रमाणो तंबाखूलाही 25 वर्षाची वयोमर्यादा?

मद्याप्रमाणो तंबाखूलाही 25 वर्षाची वयोमर्यादा?

Next
>नवी दिल्ली : मद्याप्रमाणोच तंबाखू सेवनासाठीही कायदेशीर वय 25 वर्षे करण्याचा केंद्रीय आरोग्य मंत्रलयाचा  विचार असून, सिगारेटच्या किमती 1क् टक्के वाढवून एकीकडे या व्यसनाला आळा घालत असतानाच महसूल वाढविण्याचा सरकारचा प्रयत्न राहणार आह़े  
विविध राज्यांमध्ये तंबाखू विक्रीसाठीची वयोमर्यादाही वेगवेगळी आह़े त्यामुळे ही वयोमर्यादा एकसमान म्हणजेच 25 वर्षे करण्याबाबत केंद्र सरकार प्रत्येक राज्याशी पत्रव्यवहार करणार असल्याचे केंद्रीय आरोग्य सचिव लव वर्मा यांनी सांगितल़े तंबाखूवरील कर आकारणी आणि शासनाचा महसून या विषयावरील अभ्यास अहवालाचे प्रकाशन वर्मा यांच्या हस्ते झाल़े 
तसेच याच्या अंमलबजावणीची जबाबदारी ही राज्य सरकारची असेल, असेही वर्मा यांनी स्पष्ट केल़े सिगारेटचे दर 1क् टक्कयांनी वाढविल्यास  त्यांचा वापर जवळपास 3 टक्कयांनी कमी होईल तसेच शासनाचा 7 टक्के महसूल वाढेल, असे या अहवालात नमूद केले गेले आहे. 
अहवालातील शिफरशीनुसार तंबाखू मिश्रित उत्पादनावरील कर वाढविण्यावर आमचा भर असेल, असे वर्मा म्हणाल़े तंबाखू मिश्रित उत्पादनाच्या विक्रीसाठी प्रोत्साहनात्मक उपक्रमांवर टीका करीत दोन मंत्रलयांमध्ये अधिक समन्वयाची गरज त्यांनी यावेळी व्यक्त केली़ (लोकमत न्यूजनेटवर्क)
 
4वाणिज्य मंत्रलयाचे टोबॅको प्रमोशन बोर्ड म्हणजे हास्यास्पद बाब आह़े आम्ही तंबाखू मिश्रित पदार्थाच्या वापराचा धिक्कार करीत असताना वाणिज्य मंत्रलय याच्या विक्रीला कसे प्रोत्साहन देऊ शकते? यासंदर्भात वाणिज्य मंत्रलयाकडे माझी बाजू मांडणार असून,  यासंदर्भात काय करता येईल, हे तपासले जाईल़ 
- लव वर्मा, सचिव,  केंद्रीय आरोग्य मंत्रलय

Web Title: Tobacco drinker age 25 years of age?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.