- चेतन ननावरेमुंबई : देशातील मालवाहतूकदारांनी पुकारलेल्या बेमुदत चक्काजाम आंदोलनाला शुक्रवारी, २० जुलैपासून सुरुवात होत आहे. दूध, भाजीपाला अशा अत्यावश्यक सेवांना संपातून वगळण्यात आले असले तरी स्कूल व कंपनी बससह प्रवासी सेवा पुरवणाऱ्या खासगी बस मालकांच्या संघटनेने शुक्रवारी एक दिवसाचा बंद पाळून या आंदोलनात उडी घेतली आहे. त्यामुळे सर्वसामान्यांना संपाचा फटका बसणार आहे.आॅल इंडिया मोटर ट्रान्सपोर्ट काँग्रेसचे कोअर कमिटीचे अध्यक्ष बाल मलकीत सिंग म्हणाले की, सरकार मालवाहतूकदारांच्या समस्या सोडवण्यात अपयशी ठरले आहे. म्हणूनच देशात मालवाहतूक करणाºया ९३ लाख गाड्या गुरुवारी रात्रीपासून ठप्प राहतील. या संपामुळे मालवाहतूक व्यवसायाला ४ हजार कोटी रुपयांचा फटका बसणार आहे. यामध्ये ट्रक, टेम्पो, लॉरी, टँकर अशा सर्व प्रकारच्या मालवाहतूक करणाºया वाहनांचा समावेश आहे. दूध, भाजीपाला, इंधन अशा अत्यावश्यक सेवा वाहतूक करणाºया वाहनांनाही सरकारी धोरणांचा फटका बसत आहेत. त्यामुळे स्वत:हून अत्यावश्यक सेवा पुरवणाºया वाहनांनी संपात सहभाग घेतल्यास त्यांचेही स्वागत असेल. देशातील ३ हजार ३०० संस्था व संघटना या संपात उतरतील, असा दावाही सिंग यांनी केला आहे.स्कूल व कंपनी बस एक दिवस बंद ठेवून स्कूल व कंपनी बस ओनर्स असोसिएशनने चक्काजाम आंदोलनाला पाठिंबा जाहीर केल्याचे संघटनेचे अध्यक्ष अनिल गर्ग यांनी सांगितले. गर्ग म्हणाले की, सायन येथील नित्यानंद सभागृहात पार पडलेल्या बैठकीत या आंदोलनाला पाठिंबा देण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यामध्ये महाराष्ट्रासह गुजरात, बंगळुरू येथील स्कूल बस बंद ठेवण्यावर एकमत झाले. याउलट महाराष्ट्रात काही कंपन्यांसोबत असलेल्या करारामुळे कंपनी बस मालकांपैकी केवळ ४० टक्के मालक या संपात उतरतील.याउलट प्रवासी सेवा पुरवणाºया खासगी ट्रॅव्हल्सचे मालकही संपात सामील होणार आहेत. शाळांना स्कूल बसच्या संपाची कल्पना दिली असून पालकांनी त्यांच्या जबाबदारीवर विद्यार्थ्यांची वाहतूक करण्याचे आवाहन संघटनेने केल्याचे गर्ग यांनी स्पष्ट केले.बहुतांश पालक हे नोकरदार असल्याने ते त्यांच्या पाल्यासाठी स्कूल बसची व्यवस्था करतात़ स्कूल बस संपात सहभागी झाल्याने त्यांची तारांबळ उडणार आहे़ कारण शाळेत सोडणे व आणणे अशी जबाबदारी पार पाडण्यासाठी काही पालकांना कामावर दांडी मारावी लागेल़काय आहेत मागण्या?इंधनदर आणि मालवाहतूक वाहनांवरील जीएसटी कमी करा.डिझेलचा समावेश जीएसटीमध्ये करा.सहा महिन्यांतून एकदाच इंधनाचे दर बदला.टोल वसुलीत पारदर्शकता आणा.विमा नियामक आणि विकास प्राधिकरण (आयआरडीए) या नियामक मंडळाने मालवाहतूकदारांकडून आकारण्यात येणाºया विम्याच्या रकमेत कपात करा.संपाचा फटका कोणाला?मुंबईसह देशातील महत्त्वाच्या गोदी व बंदरांवरील उलाढाल चक्काजाम आंदोलनामुळे ठप्प पडण्याची शक्यता आहे. कारण गोदी व बंदरांवर सामानाची ने-आण करणाºया टँकरसह कंटेनरही या संपात उतरणार असल्याने गोदी व बंदरावरील वाहतूक बंद राहील.याशिवाय औद्योगिक कारखाने आणि उद्योगांना मालवाहतूक बंद असल्याने मोठे नुकसान सहन करावे लागेल.बांधकाम व्यवसायालाही चक्काजाम आंदोलनाचा परिणाम सहन करावा लागेल.मुंबई, पुणे, नाशिक अशा महत्त्वाच्या शहरांमध्ये प्रवासी वाहतूक करणाºया बसही संपात उतरणार असल्याने एसटी आणि रेल्वे सेवेवर ताण येण्याची शक्यता आहे.वाहनांची संख्याराज्यातील खासगी (एसी व नॉन एसी) ट्रॅव्हल्सची संख्या 45000माल वाहतूक करणारी वाहने 93,00,000मुंबईतील स्कूल बसची संख्या 8000राज्यातील स्कूल बसची संख्या 40000कंपनी बसेस 16000
आज स्कूल बस बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 20, 2018 5:06 AM