टोलपोटी १४५ कोटींचा भुर्दंड, मोदींच्या नोटाबंदीचा ठाणे जिल्ह्याला फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 2, 2017 05:39 AM2017-09-02T05:39:35+5:302017-09-02T05:40:38+5:30

गेल्या वर्षी ८ नाव्हेंबर २०१६ला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नोटाबंदीची घोषणा करून ५०० आणि १००० रुपयांच्या नोटा चलनातून बाद केल्या. त्यानंतर देशभरातील टोलनाक्यांवर टोल भरण्यासाठी पैसे नसल्याने वाहनांच्या रांगा लागल्या

Tollpot's 145 crore land scam, Modi's blasphemy strike Thane district | टोलपोटी १४५ कोटींचा भुर्दंड, मोदींच्या नोटाबंदीचा ठाणे जिल्ह्याला फटका

टोलपोटी १४५ कोटींचा भुर्दंड, मोदींच्या नोटाबंदीचा ठाणे जिल्ह्याला फटका

Next

नारायण जाधव
ठाणे : गेल्या वर्षी ८ नाव्हेंबर २०१६ला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नोटाबंदीची घोषणा करून ५०० आणि १००० रुपयांच्या नोटा चलनातून बाद केल्या. त्यानंतर देशभरातील टोलनाक्यांवर टोल भरण्यासाठी पैसे नसल्याने वाहनांच्या रांगा लागल्या, यामुळे केंद्र शासनाने महाराष्ट्रासह इतर राज्यांतील सर्व टोलनाक्यांवर ९ नोव्हेंबर २०१६ ते २ डिसेंबर २०१६ या काळाकरिता सर्व वाहनांना पथकरातून सूट दिली. या २४ दिवसांत टोल वसूल करणाºया कंपन्यांचे जे नुकसान झाले होते, त्याची भरपाई म्हणून राज्याच्या सार्वजनिक बांधकाम विभागाने आता संबंधित कंपन्यांना १४४ कोटी ६८ लाख रुपये देण्याचा निर्णय घेतला आहे. यात सार्वजनिक बांधकाम विभागाच्या मालकीच्या १९ टोलनाक्यांसह रस्ते विकास महामंडळाच्या मालकीच्या १४ टोलनाक्यांचा समावेश आहे. केंद्राच्या निर्णयामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाला टोलच्या भरपाईपोटी हा भुर्दंड बसला आहे. यात सर्वाधिक टोलनाके ठाणे जिल्ह्यातील आहेत.
या २४ दिवसांसाठी मुंबईच्या वाशी, ऐरोली, मुलुंड, दहिसर या प्रवेशद्वारावरील टोलसाठी प्रतिदिन १ कोटी १५ लाख, मुंबई-पुणे महामार्गावर (दोन्ही मार्ग) मिळून दररोज २ कोटी, ठाणे-घोडबंदर रोड टोलनाक्यावर दररोज १३ लाख ५० हजार, भिवंडी -कल्याण-शीळफाटा टोलनाक्यासाठी प्रतिदिन साडेपाच लाख रुपये नुकसानभरपाई देण्यात येणार आहे. हे सर्व टोलनाके रस्ते विकास महामंडळाच्या मालकीचे आहेत. याशिवाय राज्यातील इतर ९ मार्गांचाही समावेश आहे. तसेच सार्वजनिक बांधकाम विभागाच्या मालकीच्या ठाणे-भिवंडी-वडपा टोलनाक्यावर दररोज १० लाख ८० हजार,अंजुर ते मानकोली रस्ता - ५ लाख ८७ हजार, मनोर-वाडा मार्गावर १५ लाख ४२ हजार आणि सायन-पनवेल महामार्गावरील टोलनाक्यावरील प्रतिदिन भरपाईपोटी ३९ हजार ८१ हजार रुपये देण्याचा निर्णय घेतला आहे. शिवाय राज्यातील इतर १५ टोलनाक्यांनाही भरपाई देण्यात येणार आहे.

टोल कंपन्यांना २०३७पर्यंत ८१३१.३७ कोटी देण्याचा निर्णय
जनतेचा असंतोष लक्षात घेऊन शासनाने सार्वजनिक बांधकाम विभागाच्या मालकीच्या २७ टोल नाक्यांसह रस्ते विकास महामंडळाच्या मालकीच्या २६ टोलनाक्यांवर एसटी, जीप, कार व तत्सम वाहनांना पथकरातून सरसकट सूट दिली आहे. त्यांच्या नुकसानभरपाईपोटी संबंधित कंपन्यांना २०१५-१६ ते २०१३६-३७पर्यंत ८१३१ कोटी ३७ कोटींची भरपाई देण्याचाही निर्णयही शासनाने घेतला आहे. यात सार्वजनिक बांधकाम ७३३७ कोटी ४४ लाख तर रस्ते विकास महामंडळ ७५३ कोटी ९३ लाख रुपये भरपाई अटी व शर्ती ठेवून देणार आहे.

Web Title: Tollpot's 145 crore land scam, Modi's blasphemy strike Thane district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.