खड्ड्यांमुळे वाहतूक कोंडी

By admin | Published: November 3, 2016 01:14 AM2016-11-03T01:14:57+5:302016-11-03T01:14:57+5:30

भेकराईनगर येथील ग्रामपंचायत चौक ते सत्यपुरम येथे वाहतूक कोंडी ही नित्याचीच झालेली आहे.

Traffic collision due to potholes | खड्ड्यांमुळे वाहतूक कोंडी

खड्ड्यांमुळे वाहतूक कोंडी

Next


फुरसुंगी : भेकराईनगर येथील ग्रामपंचायत चौक ते सत्यपुरम येथे वाहतूक कोंडी ही नित्याचीच झालेली आहे. या मार्गावर खड्डेच खड्डे आहेत. त्यामुळे वाहतुकीचा वेग मंदावला आहे. परिणामी, या चौकात वाहतूककोंडीमुळे वाहनांच्या रांगा लागतात. रोजची ही परिस्थिती असूनही प्रशासन मात्र ढिम्म आहे. ‘हे खड्डे बुजवणार कोण? रस्ते रुंद करणार कोण?’ असे प्रश्न संतप्त नागरिक विचारीत आहेत.
लहान शाळकरी मुलांना घेऊन जाणारी वाहने, ज्येष्ठ नागरिक व महिलांना रोज जीव मुठीत घेऊन रस्तावरून जावे लागते. त्यातच अतिक्रमण केलेले फळविक्रेते फटाक्याचे स्टॉल, खराब झालेला व अरुंद रस्ता यांमुळे रोज सकाळपासून दुपारपर्यंत वाहतूककोंडी होते व वाहनांच्या लाबंच लांब रांगा लागत आहेत.
रस्त्यावरील खड्ड्यांमुळे वाहतूकमंदावली आहे. त्वरित हे खड्डे बुजवावेत व त्या ठिकाणी लवकरात लवकर सिग्नल बसवावा, ही मागणी नागरिक करीत आहेत. त्यासाठी वाहतूक शाखा व स्र६ िखात्याशी पत्रव्यवहार करून आंदोलनाचा इशारा युवासेनेचे शादाब मुलाणी, दादा कामठे, संदीप देशमुख, अमित गुरव, आकाश खैरे, डॉ. सुनील घागरे यांनी दिला आहे.
(वार्ताहर)
>या रस्त्यावर अपघातांची सख्या वाढली आहे. पोलिसांचे त्याकडे दुर्लक्ष होत आहे. बेशिस्त वाहनचालकांची व वाहतूक पोलिसांची हुज्जत होत आहे. त्यातच पोलीस नियमन न करता मोठ्या वाहनांना पकडून पावती फाडतात. वाहतूककोंडीमुळे सामान्य नागरिकांना प्रवास करताना नाकी नऊ येत आहेत. या ठिकाणी ५ पोलीस असूनही वाहतूक सुरळीत का होत नाही, असा सवाल नागरिक करीत आहेत.

Web Title: Traffic collision due to potholes

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.