सचिन राऊत ल्ल अकोलाबाल क्षयरुग्णांना अत्यंत आवश्यक असलेल्या पीसी-१३ आणि पीसी-१४ या औषधांचा राज्यात तुटवडा निर्माण झाला असल्याची माहिती आरोग्य विभागाच्या विश्वसनीय सूत्रांकडून प्राप्त झाली आहे.राज्य सरकारतर्फे क्षयरोग नियंत्रणासाठी कार्यक्रम राबविण्यात येतो. मात्र औषधांच्या तुटवड्यामुळे या कार्यक्रमाला ग्रहण लागल्याचे चित्र आहे. क्षयरुग्णांचे वजनानुसार वर्गीकरण करण्यात येते. त्यात ६ ते १० किलो वजन गटाच्या बालकांना प्रोडक्ट कोड (पीसी) क्रमांक १३ आणि ११ ते १७ किलो वजन गटातील रुग्णांना प्रोडक्ट कोड (पीसी) क्रमांक १४ देण्यात येतो. बाल क्षयरुग्णांना पहिल्या डोसमध्ये २४ गोळ्या देण्यात येतात. रुग्णांना एक दिवसाआड ४ गोळ्या घ्याव्या लागतात.पहिला डोस पूर्ण झाल्यानंतर तपासणी करून दुसऱ्या टप्प्यात ३ गोळ्यांचा समावेश असलेल्या १८ गोळ्यांचे पाकीट रुग्णांना देण्यात येते. रुग्णांना १८ गोळ्यांचे पाकीट दर दिवसाआड देण्यात येतात. या औषधांचे डोस पूर्ण झाल्यानंतर बालरुग्णांना टॉनिकची गोळी देण्यात येते. मात्र बाल क्षयरुग्णांचा गोळ्यांचा डोस खासगी रुग्णालय किंवा औषध दुकानांमध्ये मिळत नसल्याची माहिती आरोग्य विभागाच्या सूत्रांनी दिली. परिणामी त्यांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे.
क्षयरोगाच्या औषधांचा तुटवडा
By admin | Published: January 22, 2015 2:02 AM