दिंडीमध्ये ट्रक घुसला; चार भाविकांचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 6, 2018 06:20 AM2018-02-06T06:20:44+5:302018-02-06T06:21:37+5:30
श्री क्षेत्र शेगाव येथे गजानन महाराज यांच्या प्रकट दिन महोत्सवात सहभागी होण्यासाठी निघालेल्या दिंडीतील अॅपे रिक्षाला ट्रकने धडक दिल्याने, चार भाविक मृत्युमुखी पडले, तर सहा जण गंभीर जखमी झाले.
अकोला : श्री क्षेत्र शेगाव येथे गजानन महाराज यांच्या प्रकट दिन महोत्सवात सहभागी होण्यासाठी निघालेल्या दिंडीतील अॅपे रिक्षाला ट्रकने धडक दिल्याने, चार भाविक मृत्युमुखी पडले, तर सहा जण गंभीर जखमी झाले. मृत वाशिम जिल्ह्यातील उमरा-कापसे येथील रहिवासी आहेत. पातूर-बाळापूर मार्गावरील बाघ फाट्यानजीक सोमवारी सायंकाळी ४च्या सुमारास हा अपघात झाला.
उमरा-कापसे येथील १७० भाविकांची दिंडी शेगावला जाण्यासाठी निघाली होती. दिंडीसोबत माल वाहून नेण्यासाठी अॅपे रिक्षा होती. त्यामध्ये ४ वारकरी बसलेले होते. दिंडी बाघ फाट्यावर विसाव्यासाठी थांबली असताना, भरधाव ट्रक दिंडीत घुसला आणि अॅपेला धडक दिली. त्यामुळे चारही वारकरी रस्त्यावर कोसळले, नंतर हा ट्रक वारकºयांच्या अंगावर जाऊन उलटला. ट्रकमधील सरकीच्या पोत्यांखाली
दबल्याने चौघांचाही जागीच मृत्यू झाला. विसावा घेत असलेले ६ भाविकही जखमी झाले.
>मृतांची नावे :
काशीनाथ चंद्रभान कापसे, रमेश कापसे, लीला कापसे, रामजी काकडे