तुकाराम मुंढेंची पुन्हा बदली; जीवन प्राधिकरणात रूजू होण्याआधीच निघाले आदेश
By ऑनलाइन लोकमत | Published: September 10, 2020 04:45 PM2020-09-10T16:45:14+5:302020-09-10T17:05:02+5:30
तुकाराम मुंढे यांना मुंबई जीवन प्राधिकरणाचा कार्यभार देण्यात आला होता. याठिकाणी रुजू होऊ नका, असा संदेश राज्य सरकारने दिला आहे.
मुंबई : नागपूरच्या महापालिका आयुक्तपदावरून बदली करत तुकाराम मुंढे यांना मुंबई जीवन प्राधिकरणचा कारभार देण्यात आला होता. कोरोनातून बरे झाल्यानंतर मुंढे यांनी अद्याप या प्राधिकरणाचे सचिवपद स्वीकारलेले नाही. तोपर्यंत राज्य सरकारने त्यांची पुन्हा बदली केली आहे.
तुकाराम मुंढे यांना मुंबई जीवन प्राधिकरणाचा कार्यभार देण्यात आला होता. याठिकाणी रुजू होऊ नका, असा संदेश राज्य सरकारने दिला आहे. तर मुंबई जीवन प्राधिकरणचा अतिरिक्त कार्यभार मदत व पुनर्वसनचे सचिव किशोर राजे निंबाळकर यांच्याकडे देण्यात आला आहे. याबाबतचे आदेश राज्य सरकारने आज दिले आहेत. एम. जे. प्रदीप चंद्र यांची नियुक्ती व्यवस्थापकीय संचालक महाराष्ट्र राज्य खनिकर्म महामंडळ नागपूर तसेच ई रवींद्रन यांची नियुक्ती सह विक्रीकर आयुक्त, विक्रीकर विभाग, मुंबई या पदावर करण्यात आली आहे.
'जेवढं लोकांचं भलं करता येईल तेवढं करत राहा, एवढं सोपं तत्वज्ञान आई-वडिलांनी मला दिलं'
तुकाराम मुंढे यांना कोणते पद मिळणार ते जाहीर केलेले नाही. त्यांच्याकडे आता कोणती जबाबदारी देण्यात येणार याबद्दल उत्सुकता आहे. तुकाराम मुंढे यांचा नागपुरातील कार्यकाळदेखील वादग्रस्तच राहिला. लोकप्रतिनिधींनी सातत्याने त्यांच्याविरोधात भूमिका घेतली. इतकेच काय तर त्यांच्यावर ‘हुकूमशहा’ अधिकारी अशीदेखील टीका करण्यात आली. दुसरीकडे ‘कोरोना’ संसर्गासंदर्भात मुंढे यांनी सुरुवातीच्या काळातच तातडीची पावले उचलली होती. त्यामुळे सुरुवातीची चार महिने नागपुरात ‘कोरोना’चा संसर्ग नियंत्रणात राहिला होता. मागील काही काळापासून मुंढे विरुद्ध लोकप्रतिनिधी हा संघर्ष पेटला होता. नागपुरचे महापौर संदीप जोशी यांनीदेखील मुंढे यांच्याविरोधात भूमिका घेतली होती.
नागपूरमध्ये काय गुन्हा केला होता?
मी गेल्या काही वर्षांत आक्रमकपणा कमी केला, स्वत:च्या स्वभावाला मुरड घातली, पण यापुढेही माझ्या कितीही बदल्या झाल्या तरी मी आयुष्यात तत्त्वांशी तडजोड करणार नाही. तत्त्वांना तिलांजली दिली तर ते माझ्या पाठीत मीच खंजीर खुपसल्यासारखे होईल, अशी भावना व्यक्त करतानाच नागपूर महापालिका आयुक्तपदावरून माझी बदली व्हावी, असा मी काय गुन्हा केला होता, असा सवाल सनदी अधिकारी तुकाराम मुंढे यांनी ‘लोकमत’शी बोलताना केला होता.
नागपुरात माझ्याविरोधात कुठलेही मुद्दे मिळत नाहीत म्हटल्यानंतर माझ्या चारित्र्यहननाचे प्रकार घडविण्यात आले. महिलांना माझ्याकडे पाठवून कपडे फाडून घेण्याचे प्रकार घडले,असा गौप्यस्फोट मुंढे यांनी केला. दररोज माझ्याविरुद्ध आरोप केले जात होते, पद्धतशीरपणे मला टार्गेट करण्यात आले. माझे मानसिक खच्चीकरण करण्याचे प्रयत्न चारपाच महिने झाले. असे का करण्यात आले? त्यात भाजपचे लोक होते, दुसरे कोण करणार तुम्हीच सांगा, असा सवाल मुंढे यांनी केला होता.
बदलीमागे नितीन गडकरी?
स्मार्ट सिटी प्रकल्पावर ताबा मिळवण्याचा प्रयत्न आणि हेकेखोरपणा हेच तुकाराम मुंढे यांना महापालिका आयुक्त पदावरून हटविण्यामागील एक मोठे कारण ठरले आहे. स्मार्ट सिटी प्रकल्पावर ज्या पद्धतीने मुंढे यांनी ताबा मिळवण्याचा प्रयत्न केला, त्यावरून ज्येष्ठ केंद्रीय मंत्री आणि नागपूरचे खासदार नितीन गडकरी खूप नाराज होते. हीच नाराजी मुंढे यांना भारी पडली आणि त्यांना नागपुरातून जावे लागले.
एका अधिकाऱ्याने सांगितले की, मुंढे यांनी जेव्हापासून नागपूर महापालिका आयुक्त पदाचा कार्यभार सांभाळला तेव्हापासूनच ते इतर अधिकाऱ्यांनाच नव्हेतर, राजकीय नेत्यांनाही काही मोजत नव्हते. त्यांनी असे वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न केला की, सर्व राजकीय नेते भ्रष्ट आहेत आणि ते स्वत: जनतेच्या हिताचे काम करीत आहेत. महापालिकेत जो भ्रष्टाचार पसरला आहे तो संपविण्याचे काम ते करीत आहेत. त्यांच्या या हेकेखोरपणामुळे अधिकारीही आश्चर्यचकित होते. इतकेच नव्हेतर, विभागीय आयुक्त आणि पोलीस आयुक्त यांची बैठकही ते मध्येच सोडून निघून जायचे.
दोन कोटींचे नुकसान; कंगना मुंबई महापालिकेवर गुन्हा दाखल करणार
नशीब म्हणतात! लॉकडाऊनमध्ये घर सफाईवेळी जॅक'पॉट' लागला; किंमत ऐकूनच भिरभिरला
मुकेश अंबानींना तगडा भिडू मिळणार; 'जगज्जेता' 20 अब्ज डॉलर गुंतवण्याच्या तयारीत
Reliance Jio दणका करणार; स्वस्त किंमतीचे 1 कोटी स्मार्टफोन विकणार
WhatsApp वरील समाजकंटकांपासून कसे वाचाल? जाणून घ्या टिप्स अन् रहा सुरक्षित