कट आॅफसाठी नामांकित महाविद्यालयांमध्ये टशन

By admin | Published: June 11, 2015 01:51 AM2015-06-11T01:51:43+5:302015-06-11T01:51:43+5:30

मुंबई विभागाच्या दहावीच्या ऐतिहासिक निकालानंतर आता येथील नामांकित महाविद्यालयांमध्ये कट आॅफ लिस्टवरून टशन रंगणार आहे

Tutan named for the cut-off colleges | कट आॅफसाठी नामांकित महाविद्यालयांमध्ये टशन

कट आॅफसाठी नामांकित महाविद्यालयांमध्ये टशन

Next

मुंबई : मुंबई विभागाच्या दहावीच्या ऐतिहासिक निकालानंतर आता येथील नामांकित महाविद्यालयांमध्ये कट आॅफ लिस्टवरून टशन रंगणार आहे. कला, वाणिज्य आणि विज्ञान शाखेसाठी सर्वोत्कृष्ट मानल्या जाणाऱ्या मुंबईतील नामांकित महाविद्यालयांची पहिली कट आॅफ लिस्ट किती मार्कांची लागणार? याची उत्सुकता विद्यार्थ्यांमध्ये आहे.
मुंबईत विज्ञान शाखेतील प्रवेशासाठी विद्यार्थ्यांत साठ्ये, रुईया आणि रुपारेल महाविद्यालयासाठी कमालीची चुरस पाहायला मिळते. तर कला शाखेतील प्रवेशासाठी अधिकतर विद्यार्थ्यांची पसंती रुईया आणि सेंट झेवियर्स महाविद्यालयाला असते. वाणिज्य शाखेची निवड करणाऱ्या विद्यार्थ्यांसमोर तर पोद्दार, जयहिंद, डहाणूकर आणि एमसीसी यांपैकी कोणत्या महाविद्यालयाची निवड करायची, असा पेच निर्माण होतो. त्यात यंदा ९० टक्क्यांहून अधिक टक्केवारी मिळवलेल्या मुंबईतील विद्यार्थ्यांची संख्या १२ हजार १०० एवढी आहे. गेल्यावर्षी ९० टक्क्यांहून अधिक गुण मिळवलेल्या विद्यार्थ्यांची संख्या ९,०११ एवढीच होती. यंदा मात्र त्यात ३,०८९ विद्यार्थ्यांची भर पडली आहे. ९५ टक्क्यांहून अधिक गुण मिळालेल्या विद्यार्थ्यांची संख्या खूप आहे.

Web Title: Tutan named for the cut-off colleges

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.