बुलडाणा जिल्ह्यासाठी दोन हजार धडक सिंचन विहिरी
By admin | Published: May 22, 2015 01:46 AM2015-05-22T01:46:24+5:302015-05-22T01:46:24+5:30
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा ; जलयुक्त शिवार अभियानाच्या कामांचे कौतुक.
खामगाव : जिल्हय़ात सुरू असलेल्या जलयुक्त शिवार अभियानाच्या कामांचा दर्जा व गती उत्तम असून, या अभियानाच्या उद्देशाला पोषक ठरण्यासाठी बुलडाणा जिल्ह्यासाठी दोन हजार धडक विहिरी मंजूर करणार असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रसार माध्यमांना दिली. टुनकी येथून मुख्यमंत्री मलकापूर येथे जात असताना जिल्हाधिकारी किरण कुरूंदकर यांनी मुख्यमंत्र्यांना जिल्ह्यातील कामांचा आढावा दिला. या कामांची प्रगती पाहून जलयुक्त शिवार अभियान अधिक गतिमान करण्याचे निर्देश त्यांनी दिले. धडक सिंचन विहिरी योजनेबाबत शेतकर्यांची मागणी असल्याचे जिल्हाधिकारी यांनी सांगताच जिल्ह्यातील खारपाणपट्टा व व्यापकता लक्षात घेता दोन हजार धडक सिंचन विहिरी मंजूर करीत असल्याचे त्यांनी सांगितले. प्रती विहीर दोन लाख ५0 हजार एवढय़ा खर्चाची असल्याने जिल्ह्यासाठी मोठा निधी या निमित्ताने मिळणार असून, या विहिरीमुळे जलसंधारणाच्या उद्देशाला आणखी बळकटी मिळणार आहे. जलयुक्त शिवारच्या कामांमध्ये लोकसहभाग वाढविण्याची सूचना त्यांनी केली.