कालच्या बैठकीतील सर्व गोष्टी लोकांपर्यंत पोहोचलेल्या आहेत. काल बंगळुरुमध्ये देशप्रेमी पक्षांची बैठक झाली. देशप्रेमी पक्षांची आघाडी स्थापन झाली आहे. या आघाडीचे शॉर्ट नाव इंडिया असे आहे. ही लढाई एका कोणत्या व्यक्ती विरुद्ध किंवा पक्षाविरोधात नाही तर हुकुमशाही विरोधात आहे. व्यक्ती येत असतात जात असतात, पक्ष येत असतात जात असतात. परंतू जो पायंडा पडत आहे, तो चुकीचा आहे, असे उद्धव ठाकरे म्हणाले.
अजित पवारांची भेट घेतल्यानंतर ठाकरेंनी पत्रकारांशी बातचित केली. य़ावेळी चांगले काम करा, राज्यासाठी चांगले काम करावे. सध्या जी काही साठमारी सुरु आहे, त्यामुळे राज्यातील प्रश्न पावसामुळे आता पाणी भरत आहे, या साठमारीमुळे शेतकऱ्याकडे दुर्लक्ष होऊ देऊ नका, असे आवाहन ठाकरे यांनी केले.
अजित पवारांनी अडीज वर्षे माझ्यासोबत काम केलेले आहे. त्यामुळे मला त्यांचा स्वभाव माहिती आहे. बाकीच्यांचे सत्तेसाठी डावपेच सुरु असले तरी त्यांच्यामुळे लोकांना वेळेवर मदत मिळेल. कारण त्यांच्याकडे राज्याच्या तिजोरीच्या चाव्या पुन्हा एकदा दिल्या गेल्या आहेत, असा विश्वास ठाकरे यांनी व्यक्त केला.
ज्या अजित पवारांमुळे शिवसेनेचा एक गट गुवाहाटीला गेला, आता तेच अजित पवार सत्तेत आले आहेत. मग खरं कोण आणि खोटं कोण य़ा प्रश्नावर हे समजायला जनता मुर्ख नाहीय, असे ठाकरे म्हणाले. हा शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र आहे. मी असे किळसवाने आणि बिभत्स व्हिडीओ पाहत नाही. परंतू, काल राज्यातील महिलांनी प्रतिक्रिया दिली आहे. त्यांच्या भावनांची कदर या सरकारने केली पाहिजे, असे ठाकरे म्हणाले.