Cabinet Meeting: काजूबोंडे, मोहाफुलांच्या दारुला विदेशी मद्याचा दर्जा; पहा मंत्रिमंडळ बैठकीतील सात महत्वाचे निर्णय
By ऑनलाइन लोकमत | Published: April 20, 2022 06:27 PM2022-04-20T18:27:24+5:302022-04-20T18:27:48+5:30
Uddhav Thackeray's Cabinet Meeting: महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने आज महत्वाचे निर्णय घेतले आहेत.
महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने आज महत्वाचे निर्णय घेतले आहेत. आज झालेल्या मंत्रीमंडळ बैठकीत पुणे मेट्रो भुयारी मार्ग, काजूबोंडे, मोहाफुलांच्या मद्याविषयी आणि नवी मुंबईत तिरुपती देवस्थानास मंदिर उभारण्यास भूखंड आदी निर्णय घेण्यात आले.
मंत्रिमंडळ बैठकीतील महत्वाचे निर्णय
- शामराव पेजे कोकण इतर मागासवर्ग आर्थिक विकास महामंडळाच्या भागभांडवलाची मर्यादा वाढविण्यास मान्यता. (इतर मागास बहुजन कल्याण विभाग)
- जिल्हा वार्षिक योजना (सर्वसाधारण) अंतर्गत शालेय शिक्षण व क्रीडा विभागाशी संबंधित योजनांची पुनर्रचना करुन त्यासाठी किमान ५ टक्के निधी राखीव ठेवण्याचा निर्णय. (शालेय शिक्षण व क्रीडा विभाग)
- मुंबईतील मौजे मनोरी (ता. बोरीवली) येथील परमपूज्य स्वामी गगनगिरी महाराज आश्रम चॅरिटेबल ट्रस्टला भाडेपट्ट्याने मंजूर शासकीय जमिनीचा भाडेपट्टा पुढील ३० वर्षासाठी नुतनीकरणाचा निर्णय. (महसूल विभाग)
- तिरुपती देवस्थानास नवी मुंबई येथे व्यंकटेश्वराचे मंदीर उभारणीसाठी भूखंड प्रदान करण्याचा निर्णय (नगरविकास विभाग)
- पुणे महानगर मेट्रो रेल्वे टप्पा -१ची विस्तारीत मार्गिका स्वारगेट ते कात्रज पूर्णत: भुयारी मेट्रो रेल्वे प्रकल्प करण्यास मान्यता (नगरविकास विभाग)
- महसूल वाढीसाठी विद्यमान एफएल-२ परवान्यातून अतिउच्च दर्जाची मद्यविक्री परवाना आणि उच्च दर्जाची मद्यविक्री परवाना असे उपवर्ग निर्माण करण्यास मान्यता. (गृह विभाग)
- काजूबोंडे, मोहाफुले पासून उत्पादित केलेल्या मद्यास विदेशी मद्य असा दर्जा देण्याचा आणि या पदार्थांसह फळे, फुले यापासून मद्यार्क उत्पादन व त्यातून विदेशी मद्यनिर्मिती करण्यासाठी धोरण. (गृह विभाग)