अहमदनगर : सोशल मीडियावर सरकारविरोधात काही लिहिल्यास नोटीस बजावली जाते. देशात अघोषित आणीबाणीसारखे वातावरण निर्माण झाले आहे, अशी टीका पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे राष्ट्रीय नेते आमदार जोगेंद्र कवाडे यांनी रविवारी येथे केली.मुस्लीम समाजाच्या सामुदायिक विवाह सोहळ््याला ते उपस्थित होते़ सरकारच्या धोरणावर त्यांनी टीका केली़ पीपल्स रिपब्लिकन पक्षआणि समविचारी पक्षांतर्फे २५ जानेवारीला रॅली काढण्यात येणार आहे़ देशाचा रिमोट कंट्रोल राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या हाती आहे.आरएसएसच्या दबावात निर्णय घेतले जातात़ भाजपाला पंधरा तोंडे आहेत़ राजकीय हेतूने हिंदुत्वाच्या नावाखाली दहशत निर्माण केल्यास सहन करणार नाही. शरद पवार यांनी मुख्यमंत्र्यांना बालिश म्हटले आहे, सरकारची ‘बोलाचा भात आणि बोलाची कढी’ आहे. पवार साहेब बोलतात म्हणजे त्यात तथ्य असणारच , असे सांगून शेतकरी कर्जमाफी हा घोळ बालिशपणाच असल्याचे ते म्हणाले़ ताजमहालबाबत भाजपा संभ्रमात असल्याचे त्यांनी सांगितले.
देशात अघोषित आणीबाणी - कवाडे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 29, 2017 4:35 AM