विजय मल्ल्याविरुद्ध अजामीनपात्र वॉरंट

By Admin | Published: February 1, 2017 02:34 AM2017-02-01T02:34:07+5:302017-02-01T02:34:07+5:30

देशातील बँकांचे कोट्यवधी रुपये घेऊन फरार झालेल्या विजय मल्ल्याविरुद्ध तपास यंत्रणेने प्रत्यार्पण अर्ज केल्यानंतर, मंगळवारी विशेष सीबीआय न्यायालयाने त्याच्याविरुद्ध

Unlawful Warrant against Vijay Mallya | विजय मल्ल्याविरुद्ध अजामीनपात्र वॉरंट

विजय मल्ल्याविरुद्ध अजामीनपात्र वॉरंट

googlenewsNext

मुंबई : देशातील बँकांचे कोट्यवधी रुपये घेऊन फरार झालेल्या विजय मल्ल्याविरुद्ध तपास यंत्रणेने प्रत्यार्पण अर्ज केल्यानंतर, मंगळवारी विशेष सीबीआय न्यायालयाने त्याच्याविरुद्ध अजामीनमात्र वॉरंट जारी केले. युनायटेड स्पिरिट या कंपनीमधून निधी अन्य ठिकाणी वळवण्यात आल्याने, २५ जानेवारी रोजी सिक्युरिटी एक्स्चेंज बोर्ड आॅफ इंडियाने (सेबी) मल्ल्या व सहा जणांवर बंदी घातली.
तर २७ जानेवारी रोजी कर्नाटक उच्च न्यायालयाने मल्ल्याविरुद्ध जामीनपात्र वॉरंट जारी केले. मल्ल्या व त्याच्या कंपनीने युनायटेड ब्रिवेरीज होल्डिंग लि. (यूबीएचएल)चे शेअर्स डियाजियोच्या नावावर हस्तांतरित न करण्याचे आश्वासन देऊनही, त्यांनी त्याचे उल्लंघन केल्याप्रकरणी कर्नाटक उच्च न्यायालयाने त्याच्याविरुद्ध जामीनपत्र वॉरंट जारी केले. स्टेट बँक आॅफ
इंडिया व अन्य काही बँकांच्या याचिकांवरील सुनावणीवेळी न्यायालयाने हा आदेश दिला. (प्रतिनिधी)

Web Title: Unlawful Warrant against Vijay Mallya

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.