मुंबई: केंद्रीय लोकसेवा आयोगाचा (यूपीएससी) निकाल जाहीर झालाय. या परीक्षेत उस्मानाबादचा गिरीश बदोले राज्यातून पहिला आहे. गिरीशनं देशात विसावा क्रमांक पटकावलाय. देशात पहिल्या पन्नासमध्ये स्थान मिळवणारा तो महाराष्ट्रातील एकमेव विद्यार्थी ठरलाय.राज्यातील आठजणांनी पहिल्या 100 जणांमध्ये स्थान मिळवलंय. दिग्विजय बोडके (54), सुयश चव्हाण (56), भुवनेश पाटील (59), पियुष साळुंखे (63), रोहन जोशी (67), राहुल शिंदे (95), मयुर काटवटे (96), वैदेही खरे (99) या विद्यार्थ्यांनी नेत्रदीपक यश मिळवत देशातील पहिल्या 100 विद्यार्थ्यांमध्ये स्थान मिळवलंय. यूपीएससी परीक्षेत राज्यातील अनेकांनी मोठं यश मिळवलंय. वल्लरी गायकवाड देशात 131 वी आली. तर यतिन देशमुख (159), रोहन बापूराव घुगे (249), श्रीनिवास वेंकटराव पाटील (275), प्रतिक पाटील (366), विक्रांत मोरे (430), तेजस नंदलाल पवार (436) यांनीही परीक्षेत चांगलं यश मिळवलंय.
यूपीएससीचा निकाल जाहीर; उस्मानाबादचा गिरीश बदोले राज्यात पहिला
By ऑनलाइन लोकमत | Published: April 27, 2018 8:05 PM