विदर्भाला वादळी पावसाचा इशारा!
By Admin | Published: May 10, 2015 12:28 AM2015-05-10T00:28:13+5:302015-05-10T00:28:13+5:30
वातावरणातील बदल आणि तापमानवाढीचा विपरित परिणाम म्हणून पुढील चार दिवसांत मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात मेघगर्जनेसह
मुंबई : वातावरणातील बदल आणि तापमानवाढीचा विपरित परिणाम म्हणून पुढील चार दिवसांत मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात मेघगर्जनेसह वादळी पाऊस पडेल, असा इशारा भारतीय हवामान शास्त्र विभागाने दिला आहे.
मागील चोविस तासांत मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी हलक्या स्वरुपाचा पाऊस पडला. उर्वरित राज्यात हवामान कोरडे होते. मध्य महाराष्ट्र व विदर्भाच्या काही भागात कमाल तापमानात सरासरीच्या तुलनेत लक्षणीय वाढ झाली आहे. तर कोकण-गोवा व मराठवाड्याच्या काही भागात कमाल तापमानात सरासरीच्या तुलनेत किंचित वाढ झाली आहे. उर्वरित राज्यात कमाल तापमान सरासरीच्या जवळपास होते. मुंबई शहराच्या कमाल तापमानातही चढ-उतार नोंदविण्यात येत असून, येथील आर्द्रता ९० टक्क्यांच्या आसपास नोंदविण्यात आली. परिणामी ऊकाड्याचे प्रमाण कायम असून, त्यात दिवसेंदिवस वाढत होत असल्याने मुंबईकर हैराण झाले आहेत. (प्रतिनिधी)