VIDEO : अकोल्यातील रॅन्चोनं बनवली मिस्ड कॉलनं सुरू होणारी बाईक
By Admin | Published: July 14, 2017 02:19 PM2017-07-14T14:19:59+5:302017-07-14T14:24:46+5:30
देवानंद आग्रे/ऑनलाइन लोकमत रोहणखेड (अकोला ), दि. 14 - मोबाइलवर मिस्ड कॉल देऊन दुचाकी सुरू करण्याचा अभिनव प्रयोग चिंचोली ...
देवानंद आग्रे/ऑनलाइन लोकमत
रोहणखेड (अकोला ), दि. 14 - मोबाइलवर मिस्ड कॉल देऊन दुचाकी सुरू करण्याचा अभिनव प्रयोग चिंचोली येथील अक्षय मंगल तेलगोटे या युवकाने साकारला आहे. विशेष म्हणजे कितीही अंतरावरून दुचाकी केवळ मोबाइलवर मिस्ड कॉल देऊन सुरू करता येत असल्याचे अक्षयने सांगितले.
अंजनगाव तालुक्यातील चिंचोली येथील अक्षय तेलगोटे हा रोहणखेड येथे आला असता त्याने मोबाइलद्वारे दुचाकी सुरू करण्याचा प्रयोग करून दाखवला. अक्षयच्या घरची परिस्थिती तशी बेताचीच. त्याला लहानपासून वेगवेगळे प्रयोग करण्याचा छंद आहे. या छंदातूनच त्याने दुचाकी मोबाइलवर मिस्ड कॉल देऊन सुरू करण्याचा प्रयोग केला आणि विशेष म्हणजे हा प्रयोग यशस्वी झाला आहे.
दुचाकीमध्ये अक्षयने सीमकार्ड बसवले आहे. हे सीमकार्ड डीव्हीडीच्या सर्किटला जोडून दुचाकीच्या इंजिनला जोडले आहे. सीमवर कॉल केला असता ते अॅक्टिव्हेट होते. सीमकार्ड अॅक्टिव्हेट झाल्यानंतर दुचाकीचे इंजिनही सुरू होते, असे अक्षय तेलगोटे याने सांगितले.
हा प्रयोग त्याने रोहणखेड येथे करून दाखवल्यानंतर ग्रामस्थांनी त्याचे भरभरुन कौतुक केले. अक्षयचं केवळ नववीपर्यंत शिक्षण झालेले आहे. परिस्थितीमुळे त्याला पुढे शिक्षण घेता आले नाही. पण त्याच्या अभिनव प्रयोगामुळे त्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.
https://www.dailymotion.com/video/x8457o8