VIDEO : खास व-हाडी ठसक्यात होतेय सुगंधी उटण्याची विक्री

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 25, 2016 11:24 AM2016-10-25T11:24:07+5:302016-10-25T11:24:07+5:30

मांगल्याचे प्रतीक असणा-या दिवाळीची चाहूल लागली असून, या दिवाळीत विशेष महत्त्व असणा-या सुगंधी उटण्यांना मागणी वाढली आहे.

VIDEO: Exclusive scissor sale | VIDEO : खास व-हाडी ठसक्यात होतेय सुगंधी उटण्याची विक्री

VIDEO : खास व-हाडी ठसक्यात होतेय सुगंधी उटण्याची विक्री

Next

राम देशपांडे, ऑनलाइन लोकमत

अकोला, दि. २५ -  मांगल्याचे प्रतीक असणा-या दिवाळीची चाहूल लागली असून, या दिवाळीत विशेष महत्त्व असणा-या सुगंधी उटण्यांना मागणी वाढली आहे. दिवाळीत अभ्यंगस्नानात उटण्याला विशेष महत्त्व असल्याने, विक्रीकरिता उपलब्ध झालेल्या वनौषधीयुक्त उटण्याचा सुगंध अकोल्याच्या बाजारपेठेत दरवळत आहे. विक्रेतेसुद्धा खास वºहाडी ठसक्यात गीते सादर करून उटणे खरेदी करण्यासाठी ग्राहकांना आकर्षित करीत आहेत. 

दिवाळीचा सण म्हणजे थंडीला सुरुवात. या काळात त्वचेची काळजी घ्यावी लागते. उटणे त्वचेसाठी उपयुक्त आहे. तसेच हे रजोगुणी तेजोमय असल्याने ते अंगाला लावताना घड्याळाच्या काट्यांच्या दिशेने बोटांच्या अग्रभागाचा अंगाला स्पर्श करून लावावे, असा नियम आहे. उटणे दुधात किंवा पाण्यात कालवून त्वचेला चोळून लावले जाते. साबणातील फेसामुळे त्वचेतील नैसर्गिक तेल व आर्द्रताही निघून जाते तर उटण्यामुळे ती राखली जाते. आध्यात्मिक दृष्टिकोनातून पाहिल्यास दिवाळी पर्वात ब्रह्मंडात तेज, आप आणि वायुयुक्त चैतन्यप्रवाहांचे भूतलावर येण्याचे प्रमाण जास्त असल्याने वायुमंडलात देवत्वाचे प्रमाणही जास्त असते. या देवत्वरूपी चैतन्यकणांचे त्या-त्या घटकांतून ग्रहण होऊन त्याचा त्याला चैतन्य फलप्राप्तीच्या दृष्टीने अधिक लाभ व्हावा यासाठी या काळात तेज, आप आणि वायुवर्धक उटणे अंगाला लावून देहाची चैतन्य ग्रहण करण्याची संवेदनशीलता वाढवली जाते. अभ्यंगस्नान नरकचतुर्दशीच्या दिवशी पहाटे उठून सूर्योदयापूर्वी केले जाते. अभ्यंग म्हणजे पायापासून डोळ्याच्या दिशेने तेल लावणे होय. हे स्नान दिवाळी ते संक्रांत असे चार महिने करावे, असे आयुर्वेद सांगते. अभ्यंगस्नान हे तिळाच्या तेलापासून केले जाते. तिळाचे तेल ज्या वनौषधीबरोबर प्रक्रिया करावे तिचे गुण आत्मसात करते. तिळाचे तेल हे उष्ण, तीक्ष्ण व सूक्ष्म गुणाचे असते, ते शरीराचा ताण शिथिल करते.
चंदन, गुलाब, मोगरा, कापूर कचरी, नागरमोथा, वाळा, आंबीहळद, बावची, कचुरा वडा, दवणा, मारवा आदी वनौषधी एकत्रित करून तयार केलेले सुगंधी उटणे अकोल्याच्या बाजारपेठेत विक्रीकरिता उपलब्ध झाले असून, ‘अंगाले लावा.. तोंडाले लावा..’ अशा खास वºहाडी ठसक्यात उटणं विक्रेते गीते सादर करून, ते खरेदी करण्यासाठी ग्राहकांना आकर्षित करीत असल्याचे दिसून येत आहे. दिवाळीनिमित्त सजलेल्या बाजारपेठेत, उटण्याचा सुगंध अधिकच चैतन्य निर्माण करीत आहे.

 

Web Title: VIDEO: Exclusive scissor sale

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.