Video: गोदावरीच्या प्रदूषित फेसामधून करावा लागतोय प्रवास; 'पर्यावरण दिनी' धक्कादायक प्रकार उघड
By ऑनलाइन लोकमत | Published: June 5, 2021 10:23 AM2021-06-05T10:23:19+5:302021-06-05T10:23:59+5:30
World Environment Day: विशेष म्हणजे आज पर्यावरण दिन साजरा केला जात असून अशा वेळी नदीच्या प्रदूषणाचा मुद्दा ऐरणीवर आल्यामुळे जिल्हा प्रशासन आणि प्रदूषण नियंत्रण मंडळ नक्की काय भूमिका घेणार याकडे पर्यावरण प्रेमींचे लक्ष लागून आहे.
शरदचंद्र खैरनार
नाशिक- गोदावरी प्रदूषण मुक्त करण्यासाठी पर्यावरण प्रेमी सरसावले असताना प्रत्यक्षात मात्र गोदावरीनदीची अवस्था दिवसेंदिवस बिकट होत आहे शहरालगत असलेल्या ओढा येथे गोदावरी नदीत प्रदूषणामुळे प्रचंड फेस आला असून अशा स्थितीत दुचाकीस्वारांना आणि वाहनचालकांना मार्ग काढीत यावे लागत आहे आज सकाळी हा धक्कादायक प्रकार घडला आहे.
विशेष म्हणजे आज पर्यावरण दिन साजरा केला जात असून अशा वेळी नदीच्या प्रदूषणाचा मुद्दा ऐरणीवर आल्यामुळे जिल्हा प्रशासन आणि प्रदूषण नियंत्रण मंडळ नक्की काय भूमिका घेणार याकडे पर्यावरण प्रेमींचे लक्ष लागून आहे. गोदावरी नदी ही सहा राज्यातून जाणारी जीवनदायिनी आहे मात्र नदीच्या प्रदूषण मुक्तीसाठी अपेक्षित प्रयत्न केले जात नाही त्र्यंबकेश्वर येथील ब्रह्मगिरी येथे उगमस्थान असलेल्या ठिकाणापासून नदीचे प्रदूषण सुरू होते त्या संदर्भात नाशिक मधील काही पर्यावरणप्रेमींनी 2012 मध्ये उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती त्या आधारे विविध प्रकारचे आदेश उच्च न्यायालयाने वेळोवेळी दिले आहेत. 2018 मध्ये या याचिकेवर निकाल लागला मात्र त्यानंतरही नाशिक शहरात तपोवन टाकळी आणि ओढा या परिसरात मोठ्या प्रमाणात फेसाळ नदी वाहत आहे.
धक्कादायक प्रकार, नाशिकमध्ये गोदावरीच्या प्रदूषित फेसामधून करावा लागतोय प्रवास, पर्यावरण दिनी वास्तव उघड #Nashik#WorldEnvironmentDaypic.twitter.com/Y2WqYcUXtF
— Lokmat (@MiLOKMAT) June 5, 2021
नाशिक शहराजवळील नाशिक तालुक्यातील एकलहरे येथील बंधाऱ्यातून रासायनिक पाणी नदीपात्रात जात असून काल पाऊस झाल्याने बंधाऱ्यातील पानवेली आणि रसायन ओढा नाल्याकडे वाहून आले आहेत त्यामुळे पाणी फेसाळ झाले आहेत त्यातच नाल्यातील फारशी काढण्यात आली असून अशा वेळी नागरिकांना फेसाळ नदीतून प्रवास करावा लागत असल्याचे चित्र आज दिसत आहे. आता तरी प्रशासनाला जाग येणार का असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.