मनीषा म्हात्रे, ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. १० - मराठा म्हणजे ओपन नाही, जे मराठा नाटक सुरु आहे ते गावामध्ये ठीक आहे, असे मराठा विरोधी खळबळजनक विधान माजी महापौर शिवसेना नेते दत्ता दळवी यांनी केले आहे. ऐन निवडणुकीच्या तोंडावर हे विधान केल्यामुळे प्रकरण तापताना दिसत आहे. उमेदवारी अर्ज घेऊन आलेल्या माजी शाखाप्रमुखासोबत संभाषणाचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. त्यात त्यांनी हे विधान केले आहे.
कोपर्डी बलात्कारानंतर राज्याच्या देश विदेशात ठीकठिकाणी मराठ्याचे आरक्षणासाठी मोर्चे निघाले. याच दरम्यान शिवसेनेच्या मुखपत्रात मुका मोर्चा म्हणून काढलेल्या कार्टून्समधून मोर्चाची त्यांनी खिल्ली उडविण्यात आली होती. त्यामुळे सेनेविरुद्ध त्यांच्याविरुद्ध मराठयांकडून संतापाची लाट उसळली होती. मात्र याच दरम्यान शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी यावर परदा टाकला. मात्र ऐन निवडणुकीच्या तोंडावर माजी महापौर आणि शिवसेना विभाग प्रमुख दत्ता दळवी यांच्या मराठ्यांविरुद्ध संभाषणाचा एक व्हिडीओ लिंक व्हायरल झाली आहे. त्यात माजी शाखाप्रमुख हे उमेदवारी अर्ज घेऊन गेले असता, त्यांनी मराठा म्हणजे ओपन नाही, जे मराठा नाटक सुरु आहे ते गावी ठीक आहे. त्यामुळे मराठा म्हणून सीट मागु नको असे सांगून त्यांना धुड़कारले आहे.' असे मराठा विरोधी खळबळजनक विधान माजी महापौर दत्ता दळवी यानी केले आहे. राजकीय पक्षांकडून टिकेची झोड उठली आहे. निवडणुकीच्या तोंडावर हे विधान केल्यामुळे वातावरण तापले आहे.
दळवींचा सारवासारव करण्याचा प्रयत्न
हे प्रकरण पेटू लागल्याचे दिसताचा दळवींनी सारवासारव करण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. 'मी स्वतः मराठा आहे, माजी शाखाप्रमुख सुभाष सावंत याला उमेदवारी न दिल्याच्या रागातून त्याने चुकीचा मेसेज पसरविण्यासाठी व्हिडिओ व्हायरल केला आहे. मी फ़क्त म्हणालो की, आपण ज्या प्रभागातून उमेदवारी मागत आहेत त्यात किती मराठा मतदार आहेत. आणि मी काही मराठ्यांच्या विरोधात नाही, फ़क्त मला आरक्षणासाठी कुणापुढे हात जोडायला आवडत नसल्याचे स्पष्टीकरण दत्ता दळवी यांनी दिले आहे.
https://www.dailymotion.com/video/x844qu1