VIDEO : गाडी सुरु करण्यासाठी प्रवाशांना बसला दररोज दयावा लागतो धक्का!
By admin | Published: August 27, 2016 02:32 PM2016-08-27T14:32:28+5:302016-08-27T15:03:15+5:30
एसटीच्या महामंडळाच्या एक ना एक बसगाडीला दररोज प्रवाशांना धक्का दयावा लागत असल्याचे चित्र वाशिममध्ये दिसत आहे.
Next
>ऑनलाइन लोकमत
वाशिम, दि. २७ - रस्त्यात मध्येच बंद पडणा-या बसगाड्यांना प्रवाशांनी धक्का देणे कदाचित संयुक्तीकही वाटेल; परंतु एसटीच्या महामंडळाच्या एक ना एक बसगाडीला दररोज प्रवाशांना धक्का दयावा लागत असल्याचे गत आठ दिवसांपासून दिसून येत आहे. मंगरुळपीर ते वाशिम येथे विविध शासकीय, निमशासकीय कार्यालयामध्ये अधिकारी, कर्मचारी येºजा करतात. अपडाऊन करीत असतांना त्यांच्यासमोर दररोज एक ना एक गाडीला धक्का देण्याचा प्रकार घडत आहे. शनिवारी असाच प्रकार घडल्याने अपडाऊन करणाºया कर्मचाºयांनी बसचालकालाचं खडसावून ‘गाडया दुरुस्त करा रे’ म्हणून आपला रोष व्यक्त केला.
नादुरुस्त गाडी बंद पडून त्या ठिकाणी प्रवाशांनी बसला धक्का दिल्यास फारसे आश्चर्य वाटू नये; परंतु एसटीच्या बस्थानकावरच एसटीला धक्का देण्याची गरज पडावी, हे पचनी पडण्यासारखे नाही; परंतु २७ आॅगस्ट रोजी असे घडले. मंगरुळपीरवरुन - वाशिम जाणारी बस सकाळी ११ वाजता निघणार तर तीला सुरु करण्यासाठी धक्का देण्याची गरज असल्याचे वाहक चालकाकडून सांगण्यात आले. त्यामुळे बसमध्ये चढलेले अर्धेअधिक प्रवासी खाली उतरले आणि त्यामधील अनेकांनी बसला धक्का देऊन तीला चालती केले.