ऑनलाइन लोकमत
भीमाशंकर, दि. 24 - श्रीक्षेत्र भीमाशंकर हे बारा ज्योतिर्लिंगापैकी सहावे ज्योतिर्लिंग असून, दरवर्षी श्रावण महिन्यात दर्शनासाठी व पावसाळी पर्यटनासाठी मोठी गर्दी होते. आज पहिला श्रावणी सोमवार असल्याने येथे लाखो भाविकांनी दर्शन घेतले.
पुणे जिल्ह्यात सह्याद्रीच्या कुशीत हिरव्यागार वृक्षांनी वेढलेल्या जंगलात आंबेगाव व खेड तालुक्याच्या हद्दीवर श्री क्षेत्र भीमाशंकर वसले आहे. भीमाशंकरचे मंदिर कोरीव काळ्या दगडामध्ये बाराव्या शतकाच्या मध्यकाळात बांधलेले असून, या मंदिराची रचना हेमाडपंथी शैलीची आहे. तसेच भीमाशंकरमधून भीमा नदीचा उगम झाला आहे. भीमाशंकर हे ठिकाण तीर्थक्षेत्राबरोबरच पर्यटनक्षेत्र म्हणून लोकांना आकर्षित करते.
https://www.dailymotion.com/video/x8458x5