ऑनलाइन लोकमत
घोटी, दि. २८ - वेस्टर्न इंडिया स्पोर्ट्स असोशियन (विसा) या संस्थेच्या वतीने आज इगतपुरी तालुक्यातील वाकी खापरी धरण परिसरातील पर्यायी रस्त्यावर राष्ट्रीय कार स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत देशभरातून आलेली तब्बल चाळीस स्पर्धकांनी या स्पर्धेत सहभाग घेतला.
या स्पर्धसाठी विसा या क्रीडा संघटनेने इगतपुरी तालुक्यातील वाळविहीर ते पिंपळगाव भटाटा या दुर्गम भागातील रस्त्याची निवड केली होती. वाळविहिर चे माजी सरपंच प्रकाश लचके,प्रकाश गातवे यांच्या हस्ते झेंडा दाखवून या स्पर्धेच्या शुभारंभ केला.
वीस किलोमीटर अंतराच्या या रस्त्याची शासनाने काही वर्षांपूर्वी निर्मिती केली आहे.तीव्र चढ उतार व प्रचंड वळणे असे या रस्त्याचे स्वरूप असल्याने या रस्त्यावर ही स्पर्धा घेण्याचे निश्चित करण्यात आले. या स्पर्धेत महाराष्ट्रासह संपूर्ण देशातून हौशी व राष्ट्रीय दर्जाचे स्पर्धक मोठ्या प्रमाणात सहभागी झाले होते.
या स्पर्धेत अनेक वाहनांना अपघात घडण्याचे प्रकार ही घडले असून कार स्पर्धेचा तालुक्यातील जनतेला थरार अनुभवण्यास मिळाला.