"विलासराव देशमुखांनी काँग्रेस सोडली होती...", सोशल मीडियावर पोस्ट अन् रितेशची संतप्त प्रतिक्रिया
By ऑनलाइन लोकमत | Published: February 18, 2024 07:46 PM2024-02-18T19:46:51+5:302024-02-18T19:47:31+5:30
Riteish Deshmukh on Father Vilasrao Deshmukh: रविवारी लातूरमध्ये माजी मुख्यमंत्री, दिवंगत विलासराव देशमुख यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण झाले.
Riteish Deshmukh News: मराठमोळा अभिनेता रितेश देशमुख कायम प्रसिद्धीच्या झोतात असतो. सोशल मीडियावर नेहमी सक्रिय असणारा रितेश अनेकदा चाहत्यांच्या प्रश्नांना उत्तर देताना दिसतो. आज रविवारी लातूर येथे माजी मुख्यमंत्री, दिवंगत नेते विलासराव देशमुख यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण झाले. या सोहळ्याला संबोधित करताना विलासराव देशमुख यांचा सुपुत्र आणि अभिनेता रितेश देशमुख याने विविध बाबींवर भाष्य केले. तसेच यावेळी तो भावूक झाल्याचे पाहायला मिळाले.
अशातच सोशल मीडियावर एका यूजरने विलासराव देशमुख यांनी काँग्रेस सोडल्याचा दावा केला. तसेच त्यांनी शिवसेना आणि भाजपच्या पाठिंब्यावर अपक्ष म्हणून विधान परिषदेची निवडणूक लढवली होती. या पोस्टवर रितेश देशमुखने मोजक्याच शब्दांत संतप्त प्रतिक्रिया दिली. तो म्हणाला की, हे असत्य आहे, कृपया जा आणि तथ्य तपासा... खरं तर सध्या काँग्रेस नेते आपला पक्ष सोडून अन्य पक्षात प्रवेश करण्याची मालिका सुरू आहे.
यूजरच्या पोस्टवर रितेशची प्रतिक्रिया
'मी भारतीय' नावाच्या यूजरने लिहिले, "विलासराव देशमुख काँग्रेसचे निष्ठावंत नेते होते. काँग्रेस सोडण्याचे त्यांच्या मनातही आले नाही, असे रितेश देशमुखने म्हटले. पण, सत्य असे आहे की, विलासराव देशमुख यांनी काँग्रेस सोडली होती आणि विधानपरिषद निवडणुकीत शिवसेना-भाजपाच्या पाठिंब्यावर अपक्ष म्हणून निवडणूक लढवली होती."
विलासराव देशमुख काँग्रेसचे निष्ठावंत नेते होते. काँग्रेस सोडण्याचे त्यांच्या मनातही आले नाही
— मी भारतीय (@Core_punekar) February 18, 2024
रितेश देशमुख
Fact:
विलासराव देशमुख यांनी काँग्रेस सोडली होती आणि विधानपरिषद निवडणूकीत सेना भाजपच्या पाठिंब्यावर अपक्ष म्हणून निवडणूक लढवली होती
दरम्यान, विलास कारखाना परिसरात आयोजित सोहळ्यात बोलताना विलासराव देशमुख यांचा पुत्र आणि अभिनेता रितेशला वडिलांच्या आठवणीने हुंदका आला. डोळे पानावले. अख्खे भाषण त्याने कंठ दाटलेल्या स्वरात केले. रितेशचा कंठ दाटून आला, डोळ्यात अश्रू आले. भाषण थांबले. त्यावेळी रितेशच्या आई वैशालीताई देशमुख यांचे डोळे पाणावले. बाजूला बंधू माजी मंत्री अमित देशमुख यांनी रितेशच्या पाठीवर हात ठेवत धीर दिला. त्यावेळी आई वैशालीताई आणि काका दिलीपराव देशमुख यांच्यासह मंचावर आणि उपस्थित अनेकांच्या डोळ्यात अश्रू तरळले.