विद्यापीठात विपश्यना पदव्युत्तर अभ्यासक्रम
By admin | Published: March 2, 2015 02:26 AM2015-03-02T02:26:08+5:302015-03-02T02:26:08+5:30
विपश्यना ही ध्यानपद्धती परदेशाप्रमाणे भारतातही लोकप्रिय झाली आहे. याचे महत्त्व ओळखून मुंबई विद्यापीठाच्या संस्कृत, पाली
मुंबई : विपश्यना ही ध्यानपद्धती परदेशाप्रमाणे भारतातही लोकप्रिय झाली आहे. याचे महत्त्व ओळखून मुंबई विद्यापीठाच्या संस्कृत, पाली विभागाने विपश्यना हा पदव्युत्तर अभ्यासक्रम सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. या प्रस्तावाला विद्यापीठाच्या विद्वत परिषदेच्या बैठकीत मान्यता देण्यात आली
आहे. तसेच हा अभ्यासक्रम २0१५-१६ या शैक्षणिक वर्षापासून सुरू होणार आहे.
विद्यापीठाच्या संस्कृत, पाली विभाग आणि विपश्यना रिसर्च इस्टिट्यूट यांच्या संयुक्त विद्यमाने विपश्यना थेअरी अॅण्ड प्रॅक्टीस
हा अभ्यासक्रम सुरू करण्यात येणार आहे. २0१५-१६ या शैक्षणिक वर्षापासून ग्लोबल पॅगोडा कॅम्पस, गोराई येथे हा अभ्यासक्रम सुरू
होईल. दोन वर्षे कालावधीचा
हा अभ्यासक्रम असून, पदवीप्राप्त विद्यार्थ्यांना या अभ्यासक्रमाला
प्रवेश घेता येणार आहे.
विपश्यना रिसर्च इस्टिट्यूट
आणि विद्यापीठाच्या तत्त्वज्ञान विभागाच्या वतीने १९९९ पासून विद्यापीठामध्ये बुद्धिस्ट स्टडीज् हा अभ्यासक्रम सुरू करण्यात आला आहे. (प्रतिनिधी)