मुंबई : भाजपा सरकारचे आवाजी मतदान वैध असल्याचा दावा अॅडव्होकेट जनरल सुनील मनोहर यांनी मंगळवारी उच्च न्यायालयात केला़ ते म्हणाले, विधानसभा अध्यक्षांकडे पहिला पर्याय हा आवाजी मतदानाचा असतो़ जर याद्वारे बहुमत सिद्ध झाल्यास वैयक्तिक मतदानाची गरज नाही़ आणि आवाजी मतदान हा नियम आहे़आवाजी मतदानाविरोधात काँग्रेसचे आमदार नसीम खान यांनी याचिका केली असून हे मतदान रद्दबातल ठरवावे, अशी मागणी केली आहे़ सामाजिक कार्यकर्ते राजकुमार अवस्थी यांनीही यासाठी स्वतंत्र याचिका केली आहे़ त्याचे प्रत्युत्तर सादर करताना अॅडव्होकेट जनरल मनोहर यांनी हा दावा केला़या वेळी शासनाच्या वतीने ज्येष्ठ विधिज्ञ श्रीहरी अणे यांनीही या मतदानात बेकायदा काहीही नसल्याचा युक्तिवाद केला़ ते म्हणाले, भाजपा सरकारला आवाजी मतदानाचा कौल मिळाला आहे़ यावर कोणत्या आमदाराला आक्षेप होता तर त्याने अविश्वास ठराव मांडणे आवश्यक होते़ पण तसे काहीच झाले नाही़ यावरील पुढील सुनावणी उद्या (बुधवारी) होणार आहे़ (प्रतिनिधी)
आवाजी मतदान वैध; राज्य शासनाचा दावा
By admin | Published: December 03, 2014 3:50 AM