पुणे - महाराष्ट्राने अंधश्रद्धा निर्मुलन कायदा केला आहे. मी कुणाच्या श्रद्धेच्या आड नाही. माझी अंत्ययात्रा काढली गेली. खऱ्या वारकरी संप्रदायात अशी अंत्ययात्रा नसते. अंत्ययात्रेत भगवा फेटा घालून कुणी बसत नाही. भगवा रंग भागवत् धर्माची परंपरा आहे. त्याचा तो अवमान आहे. हे जे लोक भूंकतायेत त्यावर जास्त बोलू नये. अंत्ययात्रा ही भाजपाची स्टंटबाजी आहे. अल्पवयीन मुलांचा त्यात गैरवापर केला आहे. वारकऱ्यांनी राजकारणात घुसू नये अशा शब्दात शिवसेना उबाठा गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी स्पष्टीकरण दिले आहे.
सुषमा अंधारे म्हणाल्या की, गणेश शेटे तेच आहेत जे कोविड काळात २०१९ आणि २०२० ला मंदिरे बंद ठेवण्याचा निर्णय घेतला तेव्हा उद्धव ठाकरेंचा राजीनामा मागितला होता. तुषार भोसले आणि हा कंपू यांनी वारी बंद केल्यामुळे रान पेटवले होते. जे कधीच वारीत पायी चालली नाही. कोविड काळात लोकांचे आरोग्य न लक्षात केवळ राजकीय स्टंट केले. कारण भाजपाकडून उघडलेली वारकरी आघाडी आहे त्यातील हे लोक आहेत. देहू आळंदीत ज्यांनी मोदींना पाचारण केले, तिथे तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित पवार यांना बोलू दिलं नव्हतं. भाजपाची ही आघाडी कधीच आम्हाला मतदान करत नव्हती. त्यांच्याकडून काय अपेक्षा ठेवणार? असा आरोप त्यांनी केला.
तसेच निव्वळ राजकीय पक्षाचे लोक उकसवत असतील. मी कधीच राजकीय पक्षाची माफी मागत नाही. पण तरीसुद्धा माझ्या बोलण्यातून कळत-नकळत कुणी दुखावलं असेल तर मी जाहीर माफी मागताना काहीही गैर वाटणार नाही. मी शिवसेनेत आल्यापासून असेल किंवा २०१८ पासून या विषयांमध्ये जात नाहीत. प्रबोधनकार ठाकरेंचा मी वारसा चालवत असेन, वंदनीय बाळासाहेबांना कर्मकांड अपेक्षित नसतील. कर्मकांड माझ्या तत्वात नाही. मी भागवत धर्माचा अपमान कधी करू शकत नाही. काही लोक राजकारण करताय असं सांगत सुषमा अंधारे यांनी भाजपावर निशाणा साधला आहे.
मला बदनाम करण्याचं षडयंत्र१४ सेकंदाच्या व्हिडिओ फिरवला गेला. पण माझं पूर्ण वाक्य असं होतं की, दादाहो, तुम्ही रेड्यामुखी वेद गायले मग आमचे गोरगरीब माणसं ज्ञानापासून वंचित राहावे असं कुठल्या धर्माला वाटेल. धर्म आणि सामान्य माणसांतील एजेंटांनी हे षडयंत्र केलंय का की गोरगरिबांना शिक्षण मिळू नये. दुसरा व्हिडिओ आहे तोही अर्धवट आलाय. ज्ञानेश्वर महाराजांनी भिंत चालवली आणि माऊली म्हणवली. माझी आई ही माझ्यासाठी विश्ववंदनीय माऊली आहे असं मी बोलले असं सुषमा अंधारे यांनी म्हटलं.
त्याचसोबत कालचा मोर्चा इतका विराट होता त्यावरून लक्ष विचलित करण्यासाठी ही बातमी आली. मी मागेच बोलले होते. मला अडकवण्याचा प्लॅन करतायेत. माझ्यावर ईडी, सीबीआय लावता येत नाही मग काय कराव? मग जुने व्हिडिओ काढून अडकवण्याचा डाव रचला जातोय. हा व्हिडिओ २००९ सालचा आहे. मीरा-भाईंदरला कार्यक्रमातील तो व्हिडिओ आहे. माझे जुने व्हिडिओ व्हायरल केले जात आहेत. मी नामस्मरण करणाऱ्यांपैकी आहे. चैतन्य मानणारी आहे. मी वारकरी संप्रदायाचं मान ठेवणारी, मी सगळी पुराणं अभ्यासली आहे. वारकरी संप्रदायातून जी गोष्ट मी शिकलीय, संत कबीर, संत तुकडोजी महाराज यांच्याकडून मी जे शिकले ते मी बोलते. परंतु जाणीवपूर्वक माझी प्रतिमा मलिन करण्याचा भाजपा प्रयत्न करतेय असा आरोप अंधारे यांनी केला.
मी कर्मकांडापासून अलिप्तजेव्हा मी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांना धारेवर धरणारे प्रश्न विचारते तेव्हा असे व्हिडिओ बाहेर काढले जातात. वारकऱ्यांकडून प्रेतयात्रा काढली गेली. इतिहासात अनेक सुधारकांच्या प्रेतयात्रा काढल्या गेल्या. मला आनंद आहे माझी दखल घेतली गेली. पण ती राजकीय सुडबुद्धीने घेतली याचा खेद आहे. माझे आजोबा कबीर पंथातील आहे. त्यामुळे कर्मकांडांपासून मी अलिप्त आहे. अंगारे, धूप, बुवाबाजी या गोष्टी मला फार पटत नाहीत. पण मी चैतन्य मानणाऱ्यांपैकी आहे. माझे कुटुंब संत तुकारामांना मानते. गेल्या १५-२० वर्षातील भाषणात मी संत तुकारामांचे उदाहरण देते असंही सुषमा अंधारे यांनी म्हटलं.