अनगाव : मुंबईसह ठाणे, पालघरमधील आदिवासींना भेडसावणाऱ्या समस्या जाणून घेण्यासाठी बैठकीचे आश्वासन देऊनही ते न पाळणाऱ्या मुख्यमंत्र्यांच्या वर्षा बंगल्यावर श्रमजीवी संघटनेचे तरुण, युवा-युवती कार्यकर्ते प्रवेश करून मुख्यमंत्र्यांना घेराव घालतील, असा इशारा संघटनेचे संस्थापक विवेक पंडित यांनी गणेशपुरी येथील स्वातंत्र्य दिन सोहळ्यात कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना दिला.आजही मुंबईसह ठाणे-पालघर जिल्ह्यातील आदिवासींना पाणी, वीज रस्ते, हक्काचे शिक्षण या मूलभूत सुविधा मिळत नाहीत. कुपोषण, आश्रमशाळेत पोषण आहार, आरोग्य सेवेचा बोजवारा या समस्या सोडविण्यात याव्यात, याकरिता एप्रिल महिन्यात नॅशनल पार्क नवापाडा, चुनापाडा, गोरेगाव येथील प्रजापुरा भरीखानपाडा अशा मुंबईतील २२२ आदिवासी पाड्यांना पायाभूत सुविधा मिळत नसल्याने तेथील आदिवासींनी एप्रिल महिन्यात इच्छामरण द्या, याकरिता मंत्रालयावर मोर्चा काढला होता. तेव्हा शिष्टमंडळाबरोबर लवकरच बैठक घेऊन चर्चा करण्याचे आश्वासन देण्यात आले होते. मात्र, तो दिवस अजूनही येत नसल्याने आपला हक्क मिळविण्यासाठी कार्यकर्त्यांना संघर्ष करण्याची तयारी ठेवा आणि ते वर्षा बंगल्यावर प्रवेश करून दाखवून घ्या, असे आवाहन विवेक पंडित यांनी कार्यकर्त्यांना केले. वजे्रश्वरी ते गणेशपुरी अशी भव्य स्वातंत्र्य दिनाची मिरवणूक काढण्यात आली होती. या वेळी समाजसेवक स्व. रशीद शहा यांच्या नावाने सुरू केलेल्या पुरस्काराने समाजातील कार्यकर्त्यांना विवेक पंडित व अध्यक्षा विद्युल्लता पंडित यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.
श्रमजीवी संघटनेचा मुख्यमंत्र्यांना इशारा
By admin | Published: August 17, 2015 1:00 AM